Advertisement

ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना भारतात बंदी

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार सापडला आहे. त्यामुळे युनायटेड किंग्डममधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना भारतात बंदी
SHARES

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार सापडला आहे. त्यामुळे युनायटेड किंग्डममधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचं नवं पण अतिशय धोकादायक स्वरुप समोर आलं आहे. कोरोनाच्या या नवीन प्रकाराचा भारतात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून युनायटेड किंगडमहून भारतात येणाऱ्या सगळ्या विमानांना २२ डिसेंबर रोजी रात्री ११.५९ पासून ते ३१ डिसेंबर रात्री ११.५९ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

२२ डिसेंबरपर्यंत विमानं युकेहून मुंबई किंवा भारतात ज्या ठिकाणी येतील त्यातील प्रवाशांना कोरोना चाचणी करणं आवश्यक असणार आहे. विमानतळांवर युकेहून येणाऱ्या प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात येणार आहे असं केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

 युकेमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लॉकडाउन पुन्हा एकदा लाॅकडाऊन लागू केला आहे. नव्या प्रकारचा करोना विषाणू हा आधीच्या विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक वेगाने फैलावतो. तसंच यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना संक्रमणाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याची कबुली स्थानिक आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी दिली आहे.



हेही वाचा -

मोनोरेलचा महसूल वाढविण्यासाठी 'जाहिरातबाजी'

मुंबई महापालिका निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढवणार - भाई जगताप



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा