भीमा कोरेगाव हिंसाचार: मुंबईला छावणीचं स्वरुप


भीमा कोरेगाव हिंसाचार: मुंबईला छावणीचं स्वरुप
SHARES

पुण्यातील भीमा-कोरेगावच्या विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद मंगळवारी मुंबईसह महाराष्ट्रात उमटले. मुंबईत मंगळवारी ठिकठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं असून बुधवारी महाराष्ट्र बंदच्या हाकेने त्यात भर पडली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहू नये म्हणून शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

३१ डिसेंबर निमित्ताने शहरात बंदोबस्तातून जरा विसावा मिळत नाही. तोच मुंबई पोलिसांसमोर आता नवीन आव्हान उभं राहिलं आहे. पुण्यातील भीमा-कोरेगाव येथील हिसांचाराचे पडसाद मुंबईत उमटल्याने शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून ३४ हजार पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या प्लाटून, शीघ्रकृती दलाच्या तुकड्या, दंगल नियंत्रण पथकाचे जवान, अश्रुधूर पथक, गृहरक्षक दल सशस्त्र ठेवण्यात आले आहे. तर तणाव दर्शक वातावरण असलेल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाणार आहे.


रस्त्यावर संघटीत होऊ नका

तसेच नागरिकांनी रात्री उशिरपर्यंत रस्त्यावर संघटीत होण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये सशस्त्र पोलिस गस्त ठेवणार आहेत. तर मिल पेशल, बिटमार्शलच्या मदतीने फिरती गस्त परिसरात राहणार आहे. मोठ्या प्रमाणात वाहने पार्किग असलेल्या ठिकाणी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये. यासाठी फिरता पहारा राहणार आहे. तसेच स्थानिक पोलिसांना परिसरातील समाजसेवक आणि शांतता कमिटीतील सदस्यांची बैठक घेऊन परिसरातील शांतता ठेवण्याचं आवाहन पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.



हेही वाचा-

मुंबईतून शंभरहून अधिक आंदोलनकर्ते ताब्यात



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा