फोर्ट येथे इमारतीला भीषण आग

 BMC
फोर्ट येथे इमारतीला भीषण आग

फोर्ट - फोर्ट मधील ब्रिटीश लेन इथल्या जे. के. सोमानी इमारतीला बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास लागलेल्या आगीला विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश अालंय. तिसऱ्या मजल्यावरील एका खासगी कार्यालयात एलपीजी सिलेंडर ब्लास्ट झाल्याने आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले. आगीत इमारतीचा 3 मजला जळून खाक झाला आहे. इमारतीच्या मध्यभाग कोसळला अजून इमारतीला तडे गेले आहेत. इमारतीतील इलेक्ट्रीकल वायर, एसी मशीन, कार्यालयीन फर्निचर आगीत जळून खाक झाले आहेत. आगीमुळे मोठया प्रमाणात वित्तहानी झाली असली, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 20 बंब गाड्या, 12 पाण्याचे टॅंकर, 2 बीए वॅन, 2 एएलपी, 2 टीटीएल वाहन पहाटेपर्यंत अथक प्रयत्न करत होते.

Loading Comments