ख्रिसमस संदर्भात गृहमंत्र्यांनी जाहिर केल्या सूचना


ख्रिसमस संदर्भात गृहमंत्र्यांनी जाहिर केल्या सूचना
SHARES

नाताळ हा ख्रिश्चन बांधवांचा महत्वाचा सण म्हणून ओळखला जात असून मुंबईत ठिक ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होता. मात्र सध्या कोरोना संक्रमणामुळे हा सण शासकिय नियमाचे पालन करून साजरा करण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत. या वर्षी नाताळ उत्सव साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करावा, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

नाताळ सणा निमित्त ख्रिश्चन बांधव चर्च मध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात. कोरोना संक्रमणाच्या काळात शेकडो नागरिक एकत्र आल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर  ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे प्रार्थनेपूर्वी चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

सूचना पुढील प्रमाणे

० नाताळ सणाच्या दरम्यान चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्रींचा देखावा उभारला जातो. हे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात.   त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

० चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी जास्तीत जास्त १० गायकांचा समावेश करण्यात यावा. प्रत्येकाला स्वतंत्र माईक द्यावे.

० घरातील ६० वर्षावरील ज्येष्ठ आणि १० वर्षाखालील मुलांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, उत्सव घरामध्येच साजरा करावा.

० आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी. ज्याचा लाभ घरी असणाऱ्या व्यक्तींनाही होईल.

० धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये.

० फटाक्याची आतिषबाजी करु नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोर पालन करावे.

० ३१ डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना ही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी ७ वा. वाजता किंवा त्यापूर्वी घेण्याचे नियोजन करता येईल का हे पाहावे,

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा