सुशांतचा नोकर दिपेश सावंतला अटक, ड्रग्सची खरेदी आणि हॅडलिंगचे आरोप

दीपेशचा जबाब एनडीपीएस अॅक्ट कलम ६७ अंतर्गत दाखल करण्यात आला होता आणि त्याला एनडीपीएस अॅक्टच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

सुशांतचा नोकर दिपेश सावंतला अटक, ड्रग्सची खरेदी आणि हॅडलिंगचे आरोप
SHARES

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने शनिवारी तिसरी अटक केली आहे. एनसीबीने ड्रग्ज तस्करी प्रकरणात सुशांतचा नोकर दिपेश सावंत यालाही अटक केली आहे. दीपेशचा जबाब एनडीपीएस अॅक्ट कलम ६७ अंतर्गत दाखल करण्यात आला होता आणि त्याला एनडीपीएस अॅक्टच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. यापूर्वी शुक्रवारी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅमुअल मिरांडा यांना एनसीबी ने ताब्यात घेतलं होतं. आतापर्यंत या प्रकरणात एनसीबीने ७ लोकांना ताब्यात घेतले आहे. शौविक आणि मिरांडाला न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कस्टडी सुनावली आहे.

हेही वाचाः- १२ सप्टेंबरपासून आणखी विशेष ट्रेन्स, सणासुदीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दीपेश सावंतला ड्रग्सची खरेदी आणि हॅडलिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याला जबाब आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारावर अटक करण्यात आली आहे. यावेळी अधिकारींनी सांगितले की, दीपेशला रविवारी सकाळी ११ वाजता न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. तर रिया चक्रवर्ती रविवारी एनसीबीच्या समोर हजर होईल. एनसीबीचे अधिकारी मुथा अशोक जैन यांनी सांगितले की, रिया आणि शोविक यांना दीपेश सावंत समोर आणण्यात येईल. यापूर्वी एस्पालेड कोर्टाने ड्रग पॅडलर कैजान इब्राहिम, शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडावर निर्णय दिला. शौविक आणि सॅम्युअलला चार दिवसांची एनसीबी कस्टडीत ठेवण्याचा निर्णय सुनावण्यात आला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा