सुशांत प्रकरणात बिहार पोलिसांनी दखल देऊ नये – सुप्रीम कोर्ट

या प्रकरणाशी संबंधित बर्‍याच गोष्टी मुंबईत घडल्या आहेत, त्यामुळे ती बिहार पोलिसांच्या तपासणीच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे सीबीआय आणि ईडी अशा गुन्ह्यांचे तपास करण्याचे आदेश असून आम्ही चौकशी करू असे सीबीआयने न्यायालयात सांगितले

सुशांत प्रकरणात बिहार पोलिसांनी दखल देऊ नये – सुप्रीम कोर्ट
SHARES

सुशांत सिंह राजपूत  आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना, सुप्रीम कोर्टाने रियावर दाखल केलेला गुन्हा पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्याच्या सुचना दिल्या आहेत. या प्रकरणाशी संबंधित बर्‍याच गोष्टी मुंबईत घडल्या आहेत, त्यामुळे ती बिहार पोलिसांच्या तपासणीच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे सीबीआय आणि ईडी अशा गुन्ह्यांचे तपास करण्याचे आदेश असून आम्ही चौकशी करू असे सीबीआयने न्यायालयात सांगितले.

हेही वाचा-चेंबूरमध्ये घराचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, ४ जण जखमी

 सुशांत आत्महत्या प्रकरणाला आता दोन महिने पूर्ण होत आले. तरी त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही.  आत्महत्येचा तपास राहिला बाजूलाच आता त्यात राजकिय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप  करू लागल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. बिहारमध्ये रिया चक्रवर्तीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत रियाने सुप्रीम कोर्टात धाव घेत, हा गुन्हा तपासासाठी मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा अशी याचिका दाखल केली. त्यावर उत्तर देताना, बिहार पोलिसांचे विशेष पथक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यांच्या तपासात अनेक महत्वाचे धागेदोरे  हाथी लागले आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अधिकाऱ्यांना क्वारनटाईन केल्याने तपास थांबला.  कलम १६६ (२ ) नुसार  कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला  अशा प्रकारे तपास  करण्यापासून रोखणे चुकीचे आहे.

हेही वाचाः- खासदार नवनीत राणा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अधिवक्ता अजय अग्रवाल यांच्या याचिकेवर २१ ऑगस्टपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. याचिकेत सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआयला देण्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावर सुशांतचे वडिल केके सिंह यांनी मुंबई पोलिसांवर आता विश्वास राहिला नसल्याची  टिका केली.  मुंबई पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तपास केला. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयला द्यायला हवा अशी इच्छा व्यक्त केली आहे. या प्रकरणाशी संबधित रिया, सुशांतचे कुटुंब, बिहार आणि महाराष्ट्र पोलिसांना लेखी उत्तरे देण्यास सांगण्यात आले. रियाने या प्रकरणात मिडिया ट्रायल थांबवण्याबाबतची मागणी केली. तर सिंह यांनी असा युक्तिवाद केला की, सुशांतला मानसिक ताण आणि फसवणूकीचा खुलासा पाटण्यातच झाला आहे, म्हणून सीआरपीसीच्या कलम १७९ अन्वये एफआयआर दाखल करण्याचा अधिकार पाटणा पोलिसांना आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, बिहार सरकारला राज्य निवडणुकांपूर्वीच या प्रकरणात राजकीय फायदा घ्यायचा आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय