युरोप टूर दरम्यान सुशांतला फोटोत भूत दिसले, रियाने काले धक्कादायक खुलासा

त्या एका चित्राने सुशांत खूपच मानसिक तणावाखाली गेला होता. आम्ही आँस्ट्रीयाला गेलो तेथेही तो डिपरेशनमध्ये होता. त्यामुळे ती टूर अर्धवट सोडून आम्ही परतल्याचे रियाने ईडीच्या चौकशीत सांगितले.

युरोप टूर दरम्यान सुशांतला फोटोत भूत दिसले, रियाने काले धक्कादायक खुलासा
SHARES

सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर त्यांच्या उदासिनतेबद्दल बर्‍याच चर्चा सुरू झाल्या आहेत. सुशांत सोबत काम केलेल्या बर्‍याच लोकांचे म्हणणे आहे की, युरोपच्या टूरनंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होती. त्यानंतर सुशांतने मानसोपच्चार डाँक्टरांकडे उपचार सुरू करून औषधे घेणे सुरू केले. रियाविरोधात एफआयआरनंतर ही टूर बरीच चर्चेत आली आहे. आता रियाने आपल्या निवेदनात तपास अधिकाऱ्यांनाही सांगितले आहे की, या सहलीमध्ये तिला पहिल्यांदा सुशांतमध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसली होती.

हेही वाचाः- कोरोनाच्या चाचण्या 'इतक्या' रुपयांनी स्वस्त, आरोग्य विभागाचे आदेश

रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंग राजपूत ऑक्टोबर २०१९ मध्ये युरोप दौर्‍यावर गेले होते. सुशांत, कुक आणि त्याची पीए अंकिता आचार्य यांच्याबरोबर काम करणाऱ्या रक्षकांनीही सांगितले आहे की युरोप ट्रिपमधून परत आल्यानंतर सुशांत बदलला होता. आता याबाबत रियाचे विधानही समोर आले आहे.  रियाने अधिकार्यांना सांगितले की ते युरोपच्या प्रवासात इटलीमधील ६०० वर्ष जुन्या हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेलच्या खोल्या खूप मोठ्या आणि भिंतींवर काही जुनी पेंटिंग्ज होती. या पेटिंगपाहून सुशांत घाबरला होता. ज्यावेळी रिया आणि शौविक बाहेरून हाँटेलमध्ये आले. त्यावेळी सुशांत घाबरलेला होता.  रियाने सांगितले की, खोलीत एक पेंटिंग होती ज्यामध्ये शनि (शनि) स्वतःचे मूल खात होते. ते चित्र पाहून सुशांत घाबरला होता. त्यावेळी तो रुद्राक्षने काही मंत्र जप करताना रियाने पाहिले. सुशांतला घाबरलेले पाहून आम्ही त्याच्यासोबत त्या रात्री त्याच खोलीत झोपलो. त्या एका चित्राने सुशांत खूपच मानसिक तणावाखाली गेला होता. आम्ही आँस्ट्रीयाला गेलो तेथेही तो डिपरेशनमध्ये होता. त्यामुळे ती टूर अर्धवट सोडून आम्ही परतल्याचे रियाने ईडीच्या चौकशीत सांगितले.

हेही वाचाः- मुंबई लोकलमध्ये चोरीला गेलेलं पाकिट तब्बल १४ वर्षांनी सापडलं

त्या ट्रिपमधून परत आल्यानंतर सुशांतची उर्जा पूर्णपणे कमी झाली होती. तो काही तास शांत बसून रहायचा. मुंबईत आल्यानंतर त्याच्या स्वभावात आणखी बदल झाले होते. तो कधी रडायचा तर कधी आरडाओरड करायचा. मात्र दुसरीकडे सुशांतच्या घरातल्यांनी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल रिया विरोधात बिहारमध्ये गुन्हा दाखल केला आहे. सुशांतला जर कुठला आजार होता. तर त्याने त्याची माहिती कुटुंबियांना का नाही दिली. सुशांतच्या घरातल्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या विरोधात रियाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत तो गुन्हा मुंबई पोलिसांकडे तपासाकरता देण्यात यावा अशी मागणी केली आहे. या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने मंगळवारपर्यंत राखून ठेवला आहे.  तसेच या संदर्भात केंद्र सरकार, महाराष्ट्र, बिहारसह संबधित सर्व घटनांनी त्यांचे लेखी म्हणणे १३ आँगस्टपर्यंत मांडावे असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा