सुशांतसाठी घरात कालसर्प योग आणि रुद्राभिषेकची करण्यात आली पूजा, खर्च एकून थक्कच व्हाल...

४ तास ही पूजा चालली. मात्र त्यावेळी सुशांत नैराक्षेत असल्याचे कुठेही दिसून आले नसल्याचे पंडित नारायण शास्त्री यांनी सांगितले.

सुशांतसाठी घरात कालसर्प योग आणि रुद्राभिषेकची करण्यात आली पूजा, खर्च एकून थक्कच व्हाल...
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून नवनवीन खुलासे समोर येत असताना. सोशल मीडियावर त्याचे जुने व्हिडिओ आणि फोटो वायरल होत आहेत. नुकताच सुशांत सिंहचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो पूजा करताना दिसत आहे. सुशांत सिंगच्या या व्हिडिओबद्दल वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असताना पंडित गोविंद नारायण यांनी  प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे.  सुशांतच्या बँक खात्याच्या डिटेल्सनुसार जुलै ते आॅगस्ट दरम्यान सुशांतच्या खात्यातून पूजेसाठी मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यात आल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचाः-मालाड ते दहिसर दरम्यान घटतेय कोरोना रूग्णांची संख्या

अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर २ महिन्यांनी त्याने घरात केलेल्या पूजेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. असे बोलले जाते की, सुशांतने एप्रिल महिन्यात त्याच्या वांद्रे येखील घरी नाशिकचे पंडित नारायण शास्त्री यांनी पूजा केली होती. कालसर्प योग आणि रुद्राभिषेक अशी पूजा केली होती. या पूजेला सुशांतची बहिण तिचे पती, आणि इतर घरातले उपस्थित होते. ४ तास ही पूजा चालली. मात्र त्यावेळी सुशांत नैराक्षेत असल्याचे कुठेही दिसून आले नसल्याचे पंडित नारायण शास्त्री यांनी सांगितले.

हेही वाचाः- गणपतीला गावी जाणाऱ्यांसाठी खूश खबर...

या पूजेसाठी सुशांतच्या खात्यातून तब्बल २ लाख २ हजार रुपये खर्च झाल्याचे त्याच्या बॅकेच्या डिटेल्समधून समोर आले आहे. सुशांतच्या खात्यातून जुलै ते आॅगस्ट दरम्यान ४ वेळा पैसे काढण्यात आले होते. पहिल्यांदा पुजा सामग्रीसाठी १४ जुलै रोजी ४५ हजार काढण्यात आले. तर २ आॅगस्टरोजी पून्हा पुजेच्या सामग्रीसाठी ८६ हजार काढण्यात आले. ८ आॅगस्टला पंडितजींची फी म्हणून ११ हजार आणि त्यानंतर १५ आॅगस्ट पून्हा पुजेचे साहित्यासाठी ६० हजार असे एकूण २ लाख २ हजार रुपये काढण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुसार ईडी या व्यवहारांची खात्री करत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय