घाटकोपरमध्ये रस्ता दुभाजकाला आदळून बाईकस्वार नाल्यात

Vikhroli
घाटकोपरमध्ये रस्ता दुभाजकाला आदळून बाईकस्वार नाल्यात
घाटकोपरमध्ये रस्ता दुभाजकाला आदळून बाईकस्वार नाल्यात
See all
मुंबई  -  

घाटकोपर येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर एका डिव्हायडरला आदळून बाईकस्वार मोठ्या नाल्यात पडल्याची घटना रविवारी रात्री घडली. हरिश बुमगेरी (25) असे या बाईकस्वाराचे नाव असून, त्याची प्रकृती अाता स्थिर आहे. दरम्यान, बाईकच्या मागे बसलेली अजून एक व्यक्ती नाल्यात पडल्याची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांनी रविवारी रात्री दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रभर कसून शोध घेतला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. 

दरम्यान, सोमवारी दुपारी नाल्यात पडलेला तरुण शुद्धीवर आल्यानंतर दुचाकीवर आपण एकटेच असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर अग्निशमन दलाचे शोधकार्य थांबवले. हरिष बुमगेरी(25) हा तरुण विक्रोळीच्या पार्कसाईट येथील राहणारा आहे. रविवारी रात्री तो काही कामानिमित्त पूर्व द्रुतगती मार्गावरून दक्षिण मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपर उड्डाणपूल सोडताच माता रमाबाई नगरच्या सुरुवातीलाच रस्त्याच्या मधोमध एक नाला आहे. या नाल्याला केवळ तीन फुटांची संरक्षण भिंत आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.