SHARE

मुंबईच्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळेस अवघ्या काही सेकंदात दुचाकी चोरणाऱ्या एका चोराला एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. देवेंद्र चाळके (२२) असं या आरोपीचं नाव असून पोलिसांना त्याने आतापर्यंत त्या भागातून २० दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. यातील ५ चोरीच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.


गुन्ह्यांची दिली कबुली

देवेंद्र हा ताडदेवच्या नवमहाराष्ट्रनगर येथील तुलसीवाडी परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. परदेशात फिरायला जाण्याची त्याची खूप इच्छा होती. मात्र घरची आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्या कारणाने त्याच्या स्वप्नांवर पाणी फेरलं जात होतं. यातूनच पैशांच्या हव्यासापोटी तो चोऱ्या करू लागला.
१ आॅक्टोंबर रोजी देवेंद्र लोअर परळ येथील महालक्ष्मी वर्कशाॅप जवळ संशयित रित्या फिरत होता. त्यावेळी गस्तीवर असलेल्या ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशी केली असता पोलिसांना त्याने गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या 'सच बोल पट्यासमोर' त्याने चोरीच्या सर्वच गुन्ह्यांची कबुली दिली.


मिळेल त्या पैशाच विकायचा दुचाकी

नुकतीच देवेंद्रने माटुंगा परिसरात राहणाऱ्या प्रमोद बिर्जे (५०) यांची एक दुचाकी चोरली होती. देवेंद्र हा चोऱ्या तर मोठ्या शिताफीने करायचा. शिवाय चोरीच्या गाड्या विकण्यासाठी काही ना काही कारण द्यायचा. जसं आपली आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाले. आता फक्त दुचाकीच उरली आहे. आईवर वैद्यकिय उपचार करणे गरजेचं असल्याचं सांगून नागरिकांकडून मिळेल ते पैसे घेऊन त्यांना ती चोरीची दुचाकी विकून पसार व्हायचा.

देवेंद्र विरोधात माहिम, दादर, ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात चोरीच्या कित्येक गुन्हयांची नोंद आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या