घाटकोपरमध्ये गटारातून वाहून गेलेल्या महिलेच्या मृत्यूबाबत, पालिकेने दिले चौकशीचे आदेश

असल्फा येथील वाहिनी ही मिठी नदीला माहिम येथे येऊन मिळते. त्यामुळे मृतदेह वाहत आला तरी तो माहिम येथे मिळणे अपेक्षित असायला हवे होते

घाटकोपरमध्ये गटारातून वाहून गेलेल्या महिलेच्या मृत्यूबाबत, पालिकेने दिले चौकशीचे आदेश
SHARES

मुंबईतील घाटकोपरमध्ये गटारातून वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सोमवारी सकाळी पहाटे ३ वाजता  हाजी अली समुद्र किनारी आढळून आला. हाजी अली परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत, पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यास सुरूवात केली. त्यावेळी घाटकोपरमध्ये २९ सप्टेंबरच्या मुसळधार पावसात एक महिला गटारात वाहून गेल्याचे कळले. या महिलेची ओळख पटली. मात्र असल्फा येथील वाहिनी ही मिठी नदीला माहिम येथे येऊन मिळते. त्यामुळे मृतदेह वाहत आला तरी तो माहिम येथे मिळणे अपेक्षित असायला हवे होते. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून हा अपघात मुंबई महापालिकेच्या चुकीमुळे घटला की, घातपात आहे. याच्या चौकशीचे आदेश पालिकेने दिले असून पोलिसही आता तपास करत आहेत.


मुंबईत शनिवारी ३ ऑक्टोबरला रात्री अचानक मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे ठिक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. यावेळी घाटकोपरच्या असल्फा भागातून पर्जन्य जलवाहिनीतून शीतल जितेश जामा नावाची ३२ वर्षीय महिला वाहून गेल्याची घटना समोर आली. आज पहाटे ३ वाजता संबंधित महिलेचा मृतदेह थेट हाजीअलीच्या समुद्रकिनारी आढळला. पण असल्फा ते हाजीअली हे अंतर जवळपास २० ते २२ किमी आहे. मृतदेह कुठेही न अडकता एवढ्या अंतरावर जाणं शक्य नसल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. शिवाय, महापालिकेने पर्जन्य जलवाहिन्या, गटारातून वाहणाऱ्या पाण्यातील कचरा अडवण्यासाठी जागोजागी मोठमोठ्या जाळ्या, ग्रील्स लावले आहेत. असल्फाच्या पुढे साकीनाका इथेही लावलेल्या ग्रील्सच्या ठिकाणी दररोज अडकलेला कचरा उपसला जातो. असल्फा येथील वाहिनी ही मिठी नदीला माहिम येथे येऊन मिळते. त्यामुळे मृतदेह वाहत आला तरी तो माहिम येथे मिळणे अपेक्षित असायला हवे होते. त्यामुळे तब्बल २० ते २२ किमीचा प्रवास करुन हाजीअलीच्या समुद्र किनारी महिलेचा मृतदेह मिळाला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचाः- सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबत ठाकरे सरकारचा प्रस्तावच नाही- पियूष गोयल

त्यामुळेच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांनी उपायुक्तांना या प्रकरणी चौकशी करुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून काही धागेदोरे मिळतात का हे पाहिले जात आहे. शिवाय मृतदेह मिळाल्याप्रकरणी ताडदेव पोलिसात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा