खारघरमध्ये बोगस डॉक्टरला अटक

पनवेल महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकाने खारघर पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये छापा मारुन त्याला रंगेहात अटक केली आहे.

खारघरमध्ये बोगस डॉक्टरला अटक
SHARES

खारघरमधील सेक्टर १५ मध्ये असलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या बोगस डॉक्टराला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. रोहित यादव (२७) असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे. त्याच्याकडं कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याचं आढळून आलं आहे. 

पनवेल महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकाने खारघर पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये छापा मारुन त्याला रंगेहात अटक केली आहे. विशेष म्हणजे शिवाजी नगर पोलिसांनी या बोगस डॉक्टरला दोन वर्षापूर्वी अटक केली होती. तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतरही त्याने पुन्हा डॉक्टर बनून रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. 

खारघरमधील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टर काम करत असल्याची तक्रार अॅड. चित्रा साळुंखे यांनी खारघर पोलिसांना दिली होती. या बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी पनवेल महापालिकेतील वैद्यकिय अधिकारी डॉ. भक्तराज भोईटे व त्यांच्या पथकाने आपल्या पथकातील व्यक्तीला पोटात दुखत असल्याचे भासवून त्याला मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास या हॉस्पिटलमध्ये पाठविले. यावेळी बोगस डॉक्टर रोहीत यादव याने त्याची तपासणी करुन त्याला इंजेक्शन व औषधाची गरज असल्याचे सांगून त्याला मेडिकलमधून औषधे आणण्यास चिट्ठी लिहून दिली. 

याबाबतची माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या हॉस्पिटलमध्ये छापा मारला. त्यांनी रोहीत यादव याच्याकडे चौकशी केली असता तो हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीत आरएमओ असल्याचे तसंच तो पेशंट तपासण्याचे व औषध देण्याचे व रुग्णांवर रात्रपाळीच्या वेळेस पूर्णतः नियंत्रण ठेवण्याचे काम करत असल्याचे सांगितले. यावेळी त्याच्याकडे वैद्यकीय पदवी नसल्याचं उघड झालं आहे.



हेही वाचा -

नवी मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद

मुंबईत २७ जूनपर्यंत निर्बंध; काय सुरू, काय बंद?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा