बोगस पॅथॉलॉजिस्ट, डॉक्टरांचा सुळसुळाट


बोगस पॅथॉलॉजिस्ट, डॉक्टरांचा सुळसुळाट
SHARES

मुंबई - मुंबईसह राज्यात बोगस पॅथॉलॉजिस्ट आणि बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. हे बोगस पॅथॉलॉजिस्ट आणि बोगस डॉक्टर रूग्णांची आर्थिक लूट करत त्यांची फसणवूक करत आहेत. मात्र या गंभीर प्रश्नाकडे राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. या बोगस पॅथॉलॉजिस्ट-बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याएेवजी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग त्यांना अधिकृत करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेने केला आहे. मंगळवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी हा आरोप करत बोगस पॅथॉलॉजिस्ट-बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली आहे.

24 मे 2016 ला डिएमएलटी किंवा तत्सम व्यक्तिंना पॅथॉलॉजी लॅब चालवता येणार नाही. अशी लॅब चालवणाऱ्यां विरोधात कडक कायदेशीर कारवाई होईल, असे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर दोन दिवसांतच 26 मे 2016 ला हे परिपत्रक तहकुब करत यासंबंधी समिती स्थापन करत समितीला अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार समितीने अहवाल दिला असून समितीनेही डिएमएलटी किंवा तत्मस व्यक्तिंना पॅथॉलॉजी लॅब चालवण्यास देऊ नये, तसेच रूग्णांच्या जिवाशी खेळू नये असा अहवाल दिला आहे. त्यानुसार या अहवालाची अंमलजबाजणी करत 26 मे परिपत्रक रद्द करत 24 मेच्या कारवाईबाबतच्या परिपत्रकाची अंमलबजावणी सरकारकडून व्हायला हवी होती. मात्र अहवाल सादर होऊन सहा महिने झाले तरी या परिपत्रकाची अंमलबजावणी झाली नसल्याने असोसिएशनने त्वरीत 26 मे चे परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली आहे.


वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रविण शिनगारे यांच्या निलंबनाची आणि चौकशीची मागणीही या वेळी करण्यात आली. डॉ. शिनगारे डिएमएलटी किंवा तत्सम व्यक्तिंना अधिकृत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हणत यादव यांनी ही मागणी केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा