कल्याण स्थानकात बोगस टीसीला अटक

कल्याण रेल्वे स्थानकात ( Kalyan railway station) बनावट तिकीट तपासनीस (Bogus TC) प्रवाशांची तिकीट तपासणी करत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना मिळाली होती.

कल्याण स्थानकात बोगस टीसीला अटक
SHARES

रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना लुबाडणाऱ्या बोगस तिकीट तपासनीसाला (टीसी) रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आशिष सोनावणे असे या बनावट टीसीचे नाव आहे. सोनावणे कोरोना चाचणी (corona test) अहवालाच्या नावाखाली प्रवाशांना लुबाडत होता. 

कल्याण रेल्वे स्थानकात ( Kalyan railway station) बनावट तिकीट तपासनीस (Bogus TC) प्रवाशांची तिकीट तपासणी करत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना मिळाली होती. माहितीनुसार विशेष पथकाने कल्याण रेल्वे स्थानकातील लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणाऱ्या फलाट क्रमांक ४-५ वर मंगळवारी पाळत ठेवली. 

स्थानकातील ४ नंबर फलाटावर मंगळवारी संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास कुमार जाधव हे आपल्या पत्नीसह लोकलची वाट पाहत बसला होते. आशिषने त्यांच्याकडे तिकीटाची विचारणा केली. जाधव यांनी तिकीट दाखवताच आशिषने त्यांच्याकडे आरटीपीसीआर चाचणी केल्याचे सर्टिफिकेट दाखविण्याची मागणी केली. त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसल्याने आशिषने त्यांच्याकडे ३०० रुपयांच्या दंडाची मागणी केली. यावेळी विशेष पथकातील रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याला घेरले आणि त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. मात्र ओळखपत्र नसल्याचे आशिषने सांगितल्यावर पथकाने त्याला कार्यालयात आणत चौकशी सुरू केली. चौकशीत तो बोगस टीसी असल्याचं उघडकीस आलं. 

लॉकडाउन काळात नोकरी गेली असून दुसरे कामही मिळत नव्हते. कमाईचे कोणतेही साधन नसल्याने आपण बनावट तिकीट तपासनीस झाल्याची कबुली आशिष सोनावणेने रेल्वे अधिकाऱ्यांसमोर दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर सुरत पोलीस ठाण्यासह कल्याणमधील विविध पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत. 



हेही वाचा -

वृक्ष छाटणीची परवानगी अॅपवरून मिळणार, महापालिकेचा मोठा निर्णय

  1. १५ जूनपर्यंत मासेमारीला परवानगी देण्याची मच्छिमारांची मागणी
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा