हिमांशु रॉय आत्महत्या : राजकीय नेतेमंडळी, बॉलिवूड कलाकारांची श्रद्धांजली


हिमांशु रॉय आत्महत्या : राजकीय नेतेमंडळी, बॉलिवूड कलाकारांची श्रद्धांजली
SHARES

पोलिस दलातील कडक शिस्तीचे अधिकारी अशी ओळख असलेले अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय यांनी शुक्रवारी आपल्या चर्चगेट येथील सुरुची या शासकीय इमारतीत राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. फक्त पोलिस दलातच नव्हे तर राजकीय नेतेमंडळी, बॉलिवूड कलाकार ते पत्रकारांपर्यंत सगळ्यांशीच त्यांचं चांगलं नातं होतं.  


 

एक कर्तबगार अधिकाऱ्याने अशा प्रकारे जगाचा निरोप घेतल्याने पोलिस दलासह सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय नेतेमंडळींपासून ते बॉलिवूड कलाकारांनीही ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलं आहे.

 गेल्या काही दिवसांपासून त्यांना कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रासलं होतं. या आजाराला कंटाळून शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास आपल्या राहत्या घरी अापल्याकडील सर्व्हिस रिवाॅल्व्हरने तोंडात गोळी झाडली आणि ही गोळी थेट डोक्यातून बाहेर आली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.


मुख्यमंत्र्यांनीही वाहिली श्रद्धांजली

राज्य आणि मुंबई पोलिस दलात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणारे वरिष्ठ अधिकारी हिमांशू रॉय यांच्या आकस्मिक निधनाने एक कर्तबगार अधिकारी आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'रॉय यांनी पोलीस दलात  विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावला आहे. एक धडाडीचे अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनामुळे एका कार्यक्षम अधिकाऱ्याला आपण मुकलो अाहोत, असं मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात.



हेही वाचा -

अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू राॅय यांची गोळी झाडून आत्महत्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा