सोनू निगमला जीवे मारण्याची धमकी? मुंबई पोलिस वाढवणार सुरक्षा


सोनू निगमला जीवे मारण्याची धमकी? मुंबई पोलिस वाढवणार सुरक्षा
SHARES

बाॅलिवूडमधील नामांकीत प्लेबॅक सिंगर सोनू निगम याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ करण्याचं ठरवलं आहे. राज्याच्या गुप्तहेर विभागाने पोलिसांना पाठवलेल्या सूचना अहवाला (अॅडव्हायझरी)मध्ये काही कट्टरपंथीय संघटना सोनू निगमच्या हत्येचा कट रचत असल्याचं म्हटलं आहे. या प्रकाराला गांभीर्याने घेत पोलिसांनी त्याला अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याचं ठरवलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुप्त अहवालात असं नमूद केलं आहे की, कट्टरपंथीय संघटना सोनू निगम याला एखाद्या सार्वजनिक ठिकाणी, एखाद्या इव्हेंटमध्ये किंवा प्रसिद्धीपर कार्यक्रमात टार्गेट करू शकतात. त्यामुळे पोलिसांनी तत्परता दाखवत सोनू निगमच्या सुरक्षेत वाढ करण्याची तयारी केली आहे.


कट्टरपंथी संघटना का नाराज?

काही दिवसांपूर्वी सोनू निगमने सगळी भोंग्यावरून पढल्या जाणाऱ्या अजानच्या आवाजावर आक्षेप घेतला होता. त्यावरून देशभरात चांगलाच गदारोळ झाला होता. याप्रकरणी अनेक कट्टरपंथी संघटनांकडून त्याला धमकी मिळाली होती.


पाकिस्तानच्या राष्ट्रगीताचा सन्मान करेन

सिनेमागृहांत वाजवण्यात येणाऱ्या राष्ट्रगीताच्या मुद्द्यावर छेडलं असता सोनू म्हणाला की, मी राष्ट्रगीताचा नक्कीच आदर करतो, परंतु राष्ट्रगीत सिनेमागृह किंवा रेस्टाॅरंटमध्ये लावणं योग्य नाही. राष्ट्रगीत मग कुठल्याही देशाचं असो, त्याचा आदर करायलाच हवा. पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजलं तरी मी उठून उभा राहिलं, असंही तो म्हणाला.



हेही वाचा-

मुस्लिम नसूनही अजानच्या आवाजाने येते जाग - सोनू निगम

पहा अजानच्या वादात कोण देतंय सोनू निगमला धमकी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा