पहा अजानच्या वादात कोण देतंय सोनू निगमला धमकी

Mumbai  -  

मशिदीवरच्या भोंग्यावरून होणाऱ्या ‘अजान’बद्दल नव्याने केलेल्या ट्विटमुळे पार्श्वगायक सोनू निगम वादात सापडलेला असतानाच स्वतःचं नाव अमिन दाऊद परकार असे सांगणाऱ्या एका व्यक्तीने सोनूला एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून ‘अजान’बद्दल कोणताही वाद निर्माण न करण्याची अणि केलाच तर भयंकर परिणामांना तयार राहण्याची खुलेआम धमकी दिली आहे. सध्या व्हॉटस् अॅपवर ही क्लिप व्हायरल झाली आहे. ‘मुंबई लाइव्ह’ या क्लिपमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या मताशी अजिबात सहमत नाही. मूळ व्हिडिओत सोनू निगमला धमकी देणाऱ्या व्यक्तीने अतिशय आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर भाषा वापरली आहे. सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आम्ही व्हिडिओतल्या आक्षेपार्ह भाग काढून टाकला आहे. मुंबईसह संपूर्ण देशात सर्व जाती-धर्माच्या नागरिकांमध्ये बांधवांमध्ये एकजूट आणि सलोखा असावा, हाच ‘मुंबई लाइव्ह’चा प्रयत्न होता, आहे आणि यापुढेही कायम असेल.

हा व्हिडिओ आम्ही तपासत आहोत. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. आमच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. तसेच सोनूला सुरक्षाही देण्यात आलेली नाही 

- अशोक दुधे, मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ता आणि पोलीस उपायुक्त 

सोनू निगमच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांबरोबरच त्याला पाठिंबा देणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. गेली 25 वर्ष मशिदींवरचे भोंगे काढा अशी मागणी करणारे वांद्र्याच्या बेहराम पाड्याचे मोहम्मद अली उर्फ बाबूभाई खान. बाबूभाईंनी सोनू निगमच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. गरज पडल्यास सोनू निगमसाठी आपण कायदेशीर लढाही देऊ असं बाबूभाईंनी सांगितलंय. पहा काय म्हणाले बाबूभाई 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना..

https://www.mumbailive.com/mr/civic/i-will-fight-sonu-nigams-case-mohammad-ali-at-babubhai-10742

Loading Comments