पीटर मुखर्जीला उपचारासाठी परवानगी

पीटर यांच्या ४ रक्तवाहिन्यांत ब्लॉकेज आहेत. त्यापैकी एकामध्ये शंभर टक्के तर इतर ३ रक्तवाहिन्यांत ९० टक्के ब्लॉकेज आहेत. त्यामुळं त्याच्यावर क्रिटिकेअर रुग्णालयात ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

पीटर मुखर्जीला उपचारासाठी परवानगी
SHARES

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी यांना ह्रदयविकाराच्या उपचारासाठी १५ दिवस क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं अखेर परवानगी दिली आहे. त्यामुळं लवकरच पीटर मुखर्जी यांना भायखळाच्या आर्थर रोड जेलमधून रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. पीटर मुखर्जीच्या प्रकृती विषयक अहवाल १२ जुलैपर्यंत सादर करण्याचेही आदेश न्यायालयानं दिले आहे

१०० टक्के ब्लॉकेज

शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी यांना मे महिन्यात प्रकृती बिघडल्यामुळं जे.जे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. छातीत कळा येत असल्यामुळं त्याच्यावर दिवसभर वैद्यकीय चाचण्या पार पडल्या. त्यावेळी पीटर यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्याची अँजिओग्राफी करण्याची आवश्यकता असल्याचं जे.जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं. पीटर यांच्या ४ रक्तवाहिन्यांत ब्लॉकेज आहेत. त्यापैकी एकामध्ये १०० टक्के तर इतर ३ रक्तवाहिन्यांत ९० टक्के ब्लॉकेज आहेत. त्यामुळं त्याच्यावर क्रिटिकेअर रुग्णालयात ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

उपचाराचा अहवाल

या शस्त्रक्रियेनंतर पीटर यांच्यावर शस्त्रक्रियेनंतरच्या आवश्यक उपचार करणं गरजेचं असल्याचं सांगत, पीटर यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात या उपचारासाठी परवानगी मिळवी, अशी मागणी केली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी देत, पीटरवरील उपचाराचा अहवाल १२ जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.



हेही वाचा -

मुंबईत अतिवृष्टी! फक्त ३ दिवसांत पडला जून महिन्याएवढा पाऊस

अण्णा बनून साऊथ आफ्रिकेहून परतला संजय नार्वेकर



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा