श्रद्धा वालकर प्रकरणात मोठा खुलासा, हाडांचा डीएनए श्रद्धाच्या...

फॉरेन्सिक अहवालात समोर आलेल्या या गोष्टीमुळे श्रद्धा हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

श्रद्धा वालकर प्रकरणात मोठा खुलासा, हाडांचा डीएनए श्रद्धाच्या...
SHARES

आरोपी आफताब पुनावालाने (Aftab Poonawala) जंगलात फेकलेल्या हाडांचा डीएनए हा श्रद्धा वालकरच्या वडिलांशी जुळला आहे. त्यामुळे आफताबने फेकलेली हाडे श्रद्धाची असल्याचे समोर आले आहे. फॉरेन्सिक अहवालात समोर आलेल्या या गोष्टीमुळे श्रद्धा हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

दिल्ली पोलिसांनी महरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून काही हाडे हस्तगत केली होती. त्याशिवाय, आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर राहत असलेल्या घरातून काही पुरावे दिल्ली पोलिसांनी जमा केले होते. यामध्ये घरात आढळलेल्या रक्ताच्या डागाचे नमुने घेतले होते. हे सगळे पुरावे न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. जंगलात सापडलेली हाडे ही आरोपी आफताब पुनावालाने दिलेल्या माहितीनंतर जप्त करण्यात आली होती.

आरोपी आफताबकडून पोलीस चौकशीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आफताबविरोधात पुरावे जमा करण्याचे मोठे आव्हान दिल्ली पोलिसांसमोर आहे. दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या वडिलांचे डीएनए सॅम्पल घेतले होते. दिल्लीतील जंगलात आढळलेली हाडे आणि श्रद्धाच्या वडिलांचा डीएनए जुळला असून ती हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मूळचे वसई येथील असलेले श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. कुटुंबीयांचा विरोध असल्याने हे दोघेही दिल्लीत स्थायिक झाले होते. मात्र, काही महिन्यानंतर श्रद्धाने आफताबकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. त्यानंतर आफताबने मे महिन्यात श्रद्धाची हत्या करत तिच्या शरिराचे तुकडे केले.हेही वाचा

व्हायग्रा विकण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा