ब्रिटनच्या व्यवसायकाला गंडवणारे अटकेत


ब्रिटनच्या व्यवसायकाला गंडवणारे अटकेत
SHARES

70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेञीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीसह त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखा 9च्या पोलिसांनी फसवणूकीच्य गुन्ह्यात अटक केली आहे. मोहम्मद सर्फराज एहशाज उर्फ अमर अनुप खन्ना (38), किशोर नाथानी (54) अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत. या दोघांनी ब्रिटनच्या एका व्यवसायिकाला भारतात बिझनेस सुरू करून देताना 19 कोटी रुपयांना गंडवल्याचं निदर्शनास आलं आहे.

भारतीय वंशज असलेले अमरजित सिंग उभी (69) हे मागील 21 वर्षांपासून ब्रिटनमध्ये रहात आहेत. अमरजित उभी यांनी ब्रिटनचं नागरिकतत्व स्विकारलं आहे. उभी यांची ब्रिटनमध्ये 'फॉरेव्हर लिव्हिंग प्रोडक्ट' नावाच्या कंपनीत डिस्ट्रीब्युटरचं काम करायचे. 1998 मध्ये सदर कंपनीला भारतात व्यवसाय करायचा असल्यानं त्याची जबाबदारी त्यांनी उभी यांच्यावर सोपवली होती. त्यामुळे उभी हे 1998 मध्ये भारतात रहायला आले.

मुंबईतल्या सांताक्रूझ परिसरात त्यांनी सर्व परवानग्या घेत 2000 मध्ये कंपनीचे कार्यालय सुरू केले. याच दरम्यान त्यांची ओळख ही दोन्ही आरोपीशी झाली होती. या दोघांनी उभी यांना भारतात कंपनीचे विविध ठिकाणी कार्यालय आणि बिझनेस वाढीच्या नावावर तब्बल 19 कोटी 22 लाख 24 हजार 556 रुपये उकळले. या फसवणूकीसाठी आरोपींनी नातेवाईक आणि भावाच्या खात्याचा वापर केला आहे. तसंच उभी यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्याच्या व्यवहाराबाबतचा एक व्हिडिओ ही आरोपींनी बनवला आहे. माञ कालांतरानं दोघांनी फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतर उभी यांनी वांद्रे पोलिसात 15 जानेवारी 2018 रोजी तक्रार नोंदवली.

दोघा आरोपींविरोधात यापूर्वी ही बांगूरनगर, वर्सोवा आणि गुन्हे शाखेत विविध फसवणूकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांनी मंगळवारी सकाळी दोघांना फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. यातील सर्फराज या आरोपीवर ज्येष्ठ अभिनेञीवर बलात्कार, खंडणी आणि फसवणूक केल्याची तक्रार ही असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनं सांगितलं.


हेही वाचा

खंडणी मागितल्याप्रकरणी आरटीआय कार्यकर्त्याला अटक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा