SHARE

गोवंडीतल्या विकासकाकडे खंडणी मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं मंगळवारी अटक केली. प्रशांत गुडेकर (46) असं या आरोपीचं नाव आहे.  80 लाखांची खंडणी यानं विकासकाकडे मागितली होती. याप्रकरणी गोवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहे.

गोवंडीच्या शिवाजी चाळ पोलिस चौकीजवळ विकासकाकडून एका चाळीच्या पूर्नविकासाचे काम सुरू होते. मागील अनेक दिवसांपासून प्रशांत हा विकासकाजवळ 80 लाख रुपयांची खंडणी मागत होता. पैसे न दिल्यास आरटीआय टाकून बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील त्रुटींची तक्रार पालिका आणि एमएमआरडीएकडे करायचा. त्यामुळे चौकशीच्या नावाखाली पालिका आणि एमएमआरडी त्या कामाला स्थगिती द्यायचे. त्यामुळे विकासकाचे काम अर्धवट राहायचे. त्यातच रेरामुळे काम वेळेत न झाल्यास सर्व रहिवाशांना १८ टक्के प्रमाणे नियमानुसार पैसे द्यावे लागले असते. त्यामुळेच विकासकनं गुडेकरला पैसे देण्याचं ठरवलं. दोघांमध्ये तडजोड अंती 12.5 लाख रुपये देण्याचं ठरलं. त्यातील 1 लाख रुपये विकासकानं गुडेकरला दिले होते.

दरम्यान मागील अनेक दिवसांपासून गुडेकरनं विकासकाकडे पैशासाठी तगादा लावला होता. रोजच्या या ञासाला कंटाळून आणि पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे विकासकानं याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदवली. विकासकानं 4 लाख रुपये घेण्यासाठी सोमवारी रात्री १० च्या सुमारास गोवंडी शिवाजी महाराज चौकात गुडेकरला पैसे घेण्यासाठी बोलवलं. यावेळी पोलिसांनी सापळा रचून गुडेकला रंगेहाथ पकडलं. याप्रकरणी गुडेकरवर गोवंडी पोलिसांनी अटक केली  आहे.


हेही वाचा

हिप्नोटाईज करून लुटणारी टोळी जेरबंद

मोबाईल वाचवायला गेलेला तरूण गंभीर जखमी, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

संबंधित विषय
ताज्या बातम्या