Advertisement

मोबाईल वाचवायला गेलेला तरूण गंभीर जखमी, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

मोबाईल चोरापासून मोबाईल वाचवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उडी मारणाऱ्या एका तरूणाला लोकलचा जबर धक्का बसला आहे. हा तरूण गंभीर जखमी झाला असून तो आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बोरीवली रेल्वे स्थानकातील ही घटना या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मोबाईल वाचवायला गेलेला तरूण गंभीर जखमी, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
SHARES

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवरील मोबाईल चोरीच्या घटना नेहमीच घडतात. पण या मोबाईल चोरीच्या घटना रोखण्यात वा चोरांच्या मुसक्या आवळ्यात रेल्वे पोलिसांना काही यश येताना दिसत नाही. त्यामुळे या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. तर आता मोबाईल चोरांमुळे प्रवाशांचा जीवही धोक्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, ती एका व्हायरल व्हिडीओमधून. मोबाईल चोरापासून मोबाईल वाचवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उडी मारणाऱ्या एका तरूणाला लोकलचा जबर धक्का बसला आहे. हा तरूण गंभीर जखमी झाला असून तो आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बोरीवली रेल्वे स्थानकातील ही घटना या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.


मोबाईल खेचून काढला पळ

मुंबईहून सुरतला जाणारे दोन प्रवासी १६ जानेवारीला रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास गाडी उशीरा येणार असल्याने बोरिवली स्थानकातील ६-७ या प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पाहत उभे होते. त्यावेळी दोघेही मोबाईल फोनमध्ये व्यस्त होते. दरम्यान, त्याचवेळी काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या एका इसमाने दोघांच्या हातातील मोबाईल खेचून घेतले आणि समोरच्या ट्रॅकवर उडी मारली. यावेळी आपला मोबाईल वाचवण्यासाठी, चोराला पकडण्यासाठी एकाने रेल्वे ट्रॅकवर उडी मारली. मात्र, ट्रॅकवर दहिसरहून बोरीवलीच्या दिशेनं जाणारी लोकल असल्याचं त्याच्या लक्षातच आलं नाही आणि ट्रॅकवर उडी मारणं काही क्षणातचं या तरूणाच्या जीवावर बेतलं. लोकलच जबर धक्का त्याला लागला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. तर चोरांनं तिथून पळ काढला. रक्तबंभाळ झालेल्या या तरूणाला तातडीनं जवळच्या रूग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. पण सध्या हा तरूण नेमका कसा आहे, तो कोणत्या रूग्णालयात दाखल आहे याची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.



हेही वाचा -

आणखी तीन एक्सप्रेसला बसवणार ‘व्हिस्टाडोम’ कोच

संपाचा बेस्टला १९.८८ कोटींचा फटका



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा