Advertisement

संपाचा बेस्टला १९.८८ कोटींचा फटका

बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा फार मोठा फटका बेस्ट प्रशासनाला बसला आहे. या संपामुळं बेस्टला १९.८८ कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे.

संपाचा बेस्टला १९.८८ कोटींचा फटका
SHARES

बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा फार मोठा फटका बेस्ट प्रशासनाला बसला आहे. या संपामुळं बेस्टला १९.८८ कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे.


१९.८८ कोटी रुपयांचे नुकसान

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप नऊ दिवस लांबला. या संपामुळे बेस्ट प्रशासनाला तब्बल १९.८८ कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. या संपादरम्यान शहरात एकूण १० ठिकाणी झालेल्या दगडफेकीच्या प्रकारणात १७ बसेसचं नुकसान झालं होतं. त्यामुळं बेस्टला ३७ हजार ३१८ रुपयांचा फटका बसला आहे. बेस्ट समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला.


नऊ दिवसांचा पगाराला कात्री

कामगारांचा वेतन करार, कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणं यांसारख्या विविध मागण्यांसाठी बेस्टचे ३० हजारांहून अधिक कर्मचारी ८ ते १६ जानेवारीपर्यंत संपावर होते. त्यामुळं झालेली नुकसानभरपाई भरून काढण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कर्मचाऱ्यांचा नऊ दिवसांचा पगार कापण्याचा घेतला. त्या संदर्भात पुढील हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली होती.


तोडग्यासाठी मध्यस्थ्याची नेमणूक

संपावर तोडगा काढण्यासाठी नवव्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्थ्याची नेमणूक केली होती. त्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या पूर्ण झाल्यावर अखेर नवव्या दिवशीच बेस्ट कृती समितीचे निमंत्रक शशांत राव यांनी संप मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केली. त्या दिवशी मुंबईच्या रत्यावर ८९३ बस धावल्या होत्या. यावेळी बेस्ट प्रशासनाला तिकीट विक्रीतून २६.०५ लाखांचा महसूल प्राप्त झाल्याचं सोमवारी बेस्ट समितीच्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

मध्य रेल्वेच्या 'राजधानी'ची कमाल, १३ मिनीटे अगोदरचं मुंबईत दाखल

मुंबईच्या किनारपट्ट्यांवर डाॅल्फिन!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा