Advertisement

आणखी तीन एक्सप्रेसला बसवणार ‘व्हिस्टाडोम’ कोच


आणखी तीन एक्सप्रेसला बसवणार ‘व्हिस्टाडोम’ कोच
SHARES

कोकणातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि सुंदर निसर्ग पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रवासी कोकणात गर्दी करतात. त्याचप्रमाणे कोकणात जाताना प्रवासादरम्यान लागणाऱ्या निर्सगाचं आणि पर्वतरांगांचं दर्शन घडवण्यासाठी  मुंबई-कोकण मार्गावर धावणाऱ्या मध्य रेल्वेनं जनशताब्दी एक्सप्रेसला काचेचे ‘व्हिस्टाडोम’ कोच बसवले आहेत. आता दुसऱ्या एक्सप्रेसमध्ये देखील या कोचचा अनुभव घेता येऊ शकतो.

प्रवाशांच्या मागणीला दाद

दरम्यान हे ‘व्हिस्टाडोम’ कोच आता इतर एक्स्प्रेसलाही बसवण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळं मुंबई-पुणे मार्गवार धावणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेसला, मुंबई ते नाशिक मार्गावर धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसला आणि मुंबई-कोकण मार्गावर धावणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसलाही ‘व्हिस्टाडोम’ कोच बसवण्याची योजना मध्य रेल्वेनं आखली आहे.

'व्हिस्टाडोम' कोचमधून पाहा कोकणाचे सौंदर्य

परदेशातील रेल्वेला बसवण्यात आलेल्या कोचच्या संकल्पनेतून मुंबई-कोकण मार्गवार धावणाऱ्या जनशताब्दी गाडीला ‘व्हिस्टाडोम’ कोच बसवण्यात आले आहेत. या ‘व्हिस्टाडोम’ कोचमुळे प्रवाशांना पारदर्शक आणि रुंद काचांच्या खिडक्यांमधून कोकणातील हिरव्या गर्द झाडीचा, डोंगरांचा तसंच धबधब्यांचा आनंद घेता येतो. त्याचप्रमाणं 'व्हिस्टाडोम' कोचमध्ये बटणाच्या सहाय्यानं पूर्ण पारदर्शक किंवा अर्धपारदर्शकही करता येण्याची सोय आहे. तसंच, या डब्यातील एका ठिकाणी ३६० डिग्रीतून फिरणाऱ्या खुर्च्यांमुळे प्रवाशांना बसल्या जागी संपूर्ण आकाशाचे दर्शन घेता येतं.


हेही वाचा

मध्य रेल्वेच्या 'राजधानी'ची कमाल, १३ मिनीटे अगोदरचं मुंबईत दाखल

संपाचा बेस्टला १९.८८ कोटींचा फटका


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा