प्रेयसीवर ब्लेड हल्ला करीत प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न!


प्रेयसीवर ब्लेड हल्ला करीत प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न!
SHARES

दादर पूर्वेकडील अप्सरा लाॅजमध्ये प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर ब्लेडने जीवघेणा हल्ला करून प्रियकराने स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अजमल शहा (२१) या तरुणाला अटक केली आहे. ही २० वर्षीय तरूणी अद्यापही बेशुद्ध असल्याचं म्हटलं जात आहे.


४ वर्षांपासून प्रेमसंबंध

अॅन्टाॅप हिलच्या संगम नगर परिसरात राहणारे अजमल शहा आणि पूजा वर्मा (बदललेलं नाव) गेल्या ४ वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये दुरावा येऊ लागला होता.


कशी घडली घटना?

सोमवारी सकाळी दोघे दादर पूर्वेकडील अप्सरा हॉटेलमध्ये गेले. काही वेळाने त्यांच्या रूममधून पूजाच्या किंचाळण्याचा आणि आपटण्याचा आवाज येऊ लागला. हा आवाज ऐकून हाॅटेलचा मॅनेजर धावत त्यांच्या रूममध्ये गेला. तिथं त्याला पूजा आणि अजमल एकमेकांशेजारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. पूजाच्या मानेतून रक्त येत होतं तर अजमलच्या दोन्ही मनगटातून रक्त वहात होतं. हे पाहून मॅनेजरने तात्काळ पोलिसांना बोलावलं आणि दोघांना केईएम रुग्णालयात दाखल केलं.


प्रेयसी अजूनही बेशुद्ध

या प्रकरणी आम्ही भादंवि ३०७ ( हत्येचा प्रयत्न) कलमांतर्गत आरोपीला अटक केली आहे. आरोपी सध्या जे. जे. रुग्णालयात दाखल आहे, तर तरूणी केईएममध्ये असून ती अजूनही बेशुद्ध असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी दिली. तरुणीच्या मानेवर ब्लेडच्या जखमा दिसून येत आहेत. त्याचबरोबर कोणत्या तरी जड वस्तूने तिच्या डोक्यात मारण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

पूजाचं दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याच्या संशयावरुन तिच्यावर हल्ला केल्याची माहिती आरोपीने भोईवाडा पोलिसांनी दिली आहे.हेही वाचा-

नायगावमध्ये महिला पोलिस कॉन्स्टेबलने केली आत्महत्या

'ब्लू फिल्म्स' दाखवून केला स्वत:च्याच मुलीवर बलात्कार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा