प्रियकराने प्रेयसीला पेटवले, पण तिने प्रियकराला मारली घट्ट मिठी

तो आपल्या वहिनीच्या बहिणीवर मागील अडीच वर्षांपासून प्रेम करयचा आणि लग्नासाठी दबाव टाकत होता. आरोपीला कांबळे कोणतेच काम करत नव्हता आणि त्याला दारुचे व्यसनही होते.

प्रियकराने प्रेयसीला पेटवले, पण तिने प्रियकराला मारली घट्ट मिठी
SHARES

व्हॅलेंटाईन वीकची नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र,व्हॅलेंटाइनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमभंग झालेल्या युवकाने आपल्या माजी प्रेयसीला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पेटलेल्या अवस्थेत प्रेयसीने प्रियकराला मिठी मारली. यामध्ये प्रियकराचा मृत्यू झाला आहे. 

जोगेश्वरीतील मेघवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गांधीनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणाचे नाव विजय खांबे (३०) आहे. तो आपल्या वहिनीच्या बहिणीवर मागील अडीच वर्षांपासून प्रेम करयचा आणि लग्नासाठी दबाव टाकत होता. आरोपीला कांबळे कोणतेच काम करत नव्हता आणि त्याला दारुचे व्यसनही होते. यामुळेच तरुणीने आणि तिच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला होता.

विजयने तरुणीला त्रास द्यायला सुरुवात केली. विजयच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रुग्णालयात आठवडाभर उपचार घेतल्यानंतर ती घरी आली होती. शुक्रवारी घरी कुणी नसताना आरोपी तिच्या घरी गेला. त्याने आपल्यासोबत आणलेली पेट्रोलची बाटली तरूणीच्या अंगावर ओतून पेटवून दिले. तरुणी ओरडत होती. मात्र विजय दारातच उभे राहून सर्व पाहत होता.

आगीत होरपळत असताना तिने आरोपीला घट्ट पकडले आणि सोडलेच नाही. यात तरुणीसह आरोपी गंभीररित्या होरपळला. दोघांना जळताना पाहून शेजाऱ्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्यांना जेजे रुग्णालयात पाठवण्यात आलं. तरुणी ८० टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.हेही वाचा -

मंगळवारी व बुधवारी माटुंगा परिसरात पाणीपुरवठा बंद

मुंबईतील 'इतकी' खासगी रुग्णालये धोकादायकसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा