प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, पैशासाठी करत होती ब्लॅकमेल

वारंवार होत असलेल्या पैशांच्या मागणीला बिपीन कंटाळला होता. रविवारी रात्री तरुणी बिपिनच्या लाल मिठी परिसरातील घरी गेली होती. तिथे त्यांच्यात शारीरिक संबंध झाले.

प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, पैशासाठी करत होती ब्लॅकमेल
SHARES

पैशासाठी ब्लॅकमेल करत असल्यामुळे प्रियकराने (boyfriend) प्रेयसीची (girlfriend)  हत्या (murder( केल्याची घटना उघडकीस आली आहे. वांद्रे (bandra) मध्ये ही घटना घडली असून आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. बिपिन विनोद कंडुलना असं अटकेत असलेल्या आरोपीचं नावं आहे. तर इशिता कुंजुर असं त्याच्या मृत प्रेयसीचं नाव आहे.

आरोपी वांद्र्यातील एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करतो तर तरुणी घरकाम करायची. दीड वर्षांपूर्वी बिपिन आणि इशिताची फेसबुकवरुन ओळख झाली होती. ओळखीचं रुपांतर आधी मैत्रीत झालं, मग दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र काही दिवस उलटल्यानंतर इशिता बिपीनकडे वारंवार पैशांची मागणी करु लागली. दीड लाख रुपये दे अन्यथा मी पोलीस ठाण्यात तुझ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार देऊन गुन्हा दाखल करेन, अशी धमकी ती त्याला देत होती. 

वारंवार होत असलेल्या पैशांच्या मागणीला बिपीन कंटाळला होता. रविवारी रात्री तरुणी बिपिनच्या लाल मिठी परिसरातील घरी गेली होती. तिथे त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्यानंतर तिने बिपिनकडे दीड लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर बलात्काराच्या खोट्या आरोपाखाली तुला अडकवेन अशी धमकी तिने दिली. बिपीनने इशिताची समजूत काढून आपण फिरायला जाऊ, असे सांगितले आणि तो तिला वांद्रे रिक्लेमेशन परिसरात घेऊन आला.

तिथे पुन्हा इशिता पैशांची मागणी करु लागली. एवढे पैसे त्याच्याकडे नसल्याचे बिपीन तिला वारंवार सांगत होता, मात्र ती ऐकायला तयार नव्हती. वांद्र्यातील सेंट फ्रान्सिस्को परिसरात आल्यावर इशिता पुन्हा पैशांची मागणी करु लागली. यावेळी इशिता स्वत:चे कपडे फाडू लागली आणि जोरजोरात आरडाओरडा करु लागली. यामुळे बिपिन घाबरला आणि त्याने इशिताचा गळा दाबला. त्यातच तिचा मृत्यू झाला. घाबरलेल्या बिपिनने तिथून पळ काढला. 

वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करुन तपासला सुरुवात केली. आजूबाजूच्या परिसरातले सीसीटीव्ही तपासले असता हे जोडपे सीसीटीव्हीत दिसून आले. त्यानुसार चौकशी करुन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या बिपीनला पोलिसांनी अटक केली.



हेही वाचा - 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज

  1. मुंबई, ठाण्यातील सर्व दुकानं खुली
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा