मारहाणीत चोरट्याचा मृत्यू

 Kandivali
मारहाणीत चोरट्याचा मृत्यू

कांदिवली - दुकानातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत एका चोरट्याचा मृत्यू झाल्याची घटना कांदिवलीतल्या लालजीपाडा येथे घडलीय. त्याचं नाव मकसूद असून तो चोरी करण्याच्या उद्देशाने दुकानात शिरला होता. मकसूद हा प्रभाग 53 मधील काँग्रेस अध्यक्ष इस्तियाक यांचा भाऊ होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लालजीपाडातल्या अवधराम एंटरप्राइसेस या दुकानात यापूर्वीही तीनवेळा चोरी झाली होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दुकानातले काही कर्मचारी रात्रीच्या दरम्यान दुकानातच थांबत होते. मात्र याबाबत मकसूदला माहीत नव्हते. पण जेव्हा मकसूद दुकानात चोरी करण्यासाठी शिरला तेव्हा अचानक आत झोपी गेलेले सर्व कर्मचारी जागे झाले तेव्हा त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या कर्मचाऱ्यांनी त्याला घेराव घालत त्याला इतकं चोपले की त्यात चोरट्याचा मृत्यू झाला. कर्मचाऱ्यांनी याची माहिती दुकान मालकाला दीली. तर दुकान मालकाने तात्काळ याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी मकसूदच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करत तपास सुरू केला आहे.

Loading Comments