दादरमध्ये बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

 Dadar (w)
दादरमध्ये बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

दादर - वरळी बावनचाळच्या वरळी बस डेपोमधून संगमनेरला जाणाऱ्या 110 क्रमांक असलेल्या बसखाली चिरडून एकाचा मृत्यू झाला. पार्थ सारथी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ही घटना दादर कबुतरखाना येथील डिसिल्वा शाळेसमोर असलेल्या गोल मंदिराजवळ घडली.

अपघातावेळी दिलीप फडतरे हे बस चालक म्हणून कार्यरत होते. तर, बस वेगात वळवून घेत असताना हा अपघात झाला असल्याचं शिवाजी पार्क पोलिसांनी सांगितले.

Loading Comments