बेस्टची सहा गाड्यांना टक्कर, 2 जखमी

 Dalmia Estate
बेस्टची सहा गाड्यांना टक्कर, 2 जखमी
बेस्टची सहा गाड्यांना टक्कर, 2 जखमी
बेस्टची सहा गाड्यांना टक्कर, 2 जखमी
बेस्टची सहा गाड्यांना टक्कर, 2 जखमी
बेस्टची सहा गाड्यांना टक्कर, 2 जखमी
See all

मुलुंड - पार्क साईट परिसरातल्या गांधीनगर सिग्नलजवळ भीषण अपघात झाला. एका बेस्टनं सहा गाड्यांना टक्कर दिली. यामध्ये 2 जण जखमी झालेत. बेस्ट चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि त्यानं रस्त्यात येणाऱ्या तीन कार आणि तीन रिक्षांना धडक दिली. अपघात झाला तेव्हा बेस्ट बसमध्ये 55 प्रवासी होते. यापैकी एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झालीय. तर एक रिक्षा चालक जखमी झालाय. पोलिसांनी बेस्ट चालकाला ताब्यात घेतलंय. बस चालक दारूच्या नशेत तर नव्हता ना पोलीस याचाही तपास करत आहेत.

बेस्ट बस सिग्नलजवळून टर्न घेताना स्पीडमध्ये होती. त्यामुळे चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला, असं एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. 

Loading Comments