पैशाच्या वादातून व्यापाऱ्याला मारहाण, सीसीटीव्हीने केली पोलखोल


पैशाच्या वादातून व्यापाऱ्याला मारहाण, सीसीटीव्हीने केली पोलखोल
SHARES

व्याजावर घेतलेले 7 लाख रुपये व्याजासह परत केल्यानंतरही व्यापाऱ्याला त्याच्याच घरात घुसुन मारल्याचा प्रकार घाटकोपरमध्ये समोर आला आहे. विशेष म्हणजे या व्यापऱ्याच्या घरात लावलेल्या सीसीटीव्हीमुळे मारहाण करणारा सावकार आणि त्याच्या साथीदाचे बिंग फुटले.
सुरुवातीला या प्रकरणात लक्ष न घालणाऱ्या घाटकोपर पोलिसांना आयुक्तांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करणे भाग पडले, या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी सावकारासह अन्य तिघांना अटक केली आहे.

काय आहे हा वाद?

घटकोपरच्या अमृतनगर येथे राहणारे विकास चौधरी (30 ) यांचा जीन्स पँटसाठी लागणाऱ्या चेन बनवण्याचा व्यवसाय आहे. आपल्या व्यवसायासाठी त्यांनी मनोज ठाकूर या सावकाराकडून मार्च 2016 ला थोडे थोडे करत एकूण 7 लाख रुपये 3 टक्के व्याजाने घेतले. त्यानंतर जून 2017 पर्यंत मनोजने व्याजासह साडे नऊ लाख रुपये परत केलेही, पण त्यानंतर मनोज आणि त्याच्या साथीदारांनी घरात शिरून मारहाण केल्याचे विकास यांनी सांगितले.


पैसे परक केल्यानंतरही मनोज माझ्याकडून 10 टक्के व्याज मागू लागला. मी नकार देताच मला मारहाण करणे आणि धमकी देण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी मनोज माझ्या घरात घुसला आणि मी सही करून ठेवलेले चेक घेऊन गेला. त्यानंतर हे चेक बँकेत टाकून माझ्या विरुद्ध चेक बाऊन्सची केस करेन अशी धमकी देऊ लागला. त्यानंतर मी माझ्या घरातच सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतले.
- विकास चौधरी, पीडित व्यापारी

27 तारखेल मनोज आणि त्याचे साथीदार अल्ताफ शेख, अजय चौधरी आणि राकेश चौधरी विकासच्या घरात घुसले आणि त्यांनी पैशावरून विकासला बेदम मारहाण केली त्याचा छोटा भाऊ मध्ये पडला असता त्याला देखील मारहाण करण्यात आली.

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून ही फुटेज घेऊन मी घाटकोपर पोलीस ठाण्यात गेलो, पण तिथे पोलिसांनी माझे म्हणणे ऐकलेच नाही, फुटेज दाखवून देखील त्यांनी केस घेण्यास नकार दिला. शेवटी मी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आणि त्यानंतर कुठे गुन्हा दाखल झाला.
- विकास चौधरी, पीडित व्यापारी

या प्रकरणी आयुक्तांच्या दमदाट्यांनंतर मारहाण, घरात घुसणे, डांबून ठेवणे इत्यादी कलमांतर्गत मनोजविरोधात गुन्हा दाखल झाला असून यामध्ये चौघांना अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा - 

गाडी धुण्यास उशीर झाल्याने सुरक्षारक्षकाला मारहाण

उल्हासनगरमध्ये बंदुकीचा थरार! धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले...


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा