गोरेगावमध्ये व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या


गोरेगावमध्ये व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
SHARES

गोरेगाव पूर्वेकडील विरवानी औदयोगिक वसाहतीत रविवारी रात्री 11.20 च्या सुमारास  सदनीसिंग चावडा या व्यावसायिकाची रस्त्यात गोळया झाडून हत्या करण्यात आली.   याप्रकरणी वनराई पोलिसांनी चोरीसह हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.


रोकड असलेली बॅग पळवली

 विरवानी औदयोगिक वसाहतीतील एका वाईन शॉपचे मालक असलेले सदनीसिंग चावडा हे त्यांचे सहकारी कमलेश यादव यांच्यासह त्यांची गाडी पार्क असलेल्या ठिकाणी पायी जात होते.  त्यांच्या हातात अडीच ते तीन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग होती. यावेळी  तेथे दोन इसम मास्क लावून दुचाकीवरून आले. त्यांनी चावडा यांच्यावर पिस्तूलने गोळया झाडल्या.  त्यातील एक गोळी चावडा यांच्या डोक्याच्यावर लागली. त्यानंतर आरोपीनी त्यांच्या हातातील रोकड असलेली बॅग घेऊन पलायन केले.

 चावडा यांच्या डोक्यावर गोळी लागल्याने ते बेशुध्द झाले होते. त्यांना जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांच्या नातेवाईकांनी अंधेरीतील कोकीलाबेन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. चावडा हे गोरेगाव पश्चिम परिसरात वास्तव्यास होते. या घटनेची माहिती त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याने पोलिसांना दिली .परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेसह सात पथक आरोपींचा शोध घेत आहेत.हेही वाचा -

ग्रँटरोडच्या शौचालयात सापडली गुहा! बाहेर निघाल्या बारबाला!!

मुंबई पोलिस आयुक्तपदाची माळ संजय बर्वे यांच्या गळ्यात?

 Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

कोलकाता विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्स मिळवेल का पहिला विजय ?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा