लाइट, कॅमेरा आणि....चोरी !

Goregaon East
लाइट, कॅमेरा आणि....चोरी !
लाइट, कॅमेरा आणि....चोरी !
लाइट, कॅमेरा आणि....चोरी !
लाइट, कॅमेरा आणि....चोरी !
लाइट, कॅमेरा आणि....चोरी !
See all
मुंबई  -  

बॉलिवूड चित्रपटांच्या शुटींगचा बनाव करून कॅमेरा भाड्याना घेऊन त्याची विक्री करणाऱ्या दोघांना गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. चिंतन देसाई(27) आणि गौरव कुलकर्णी(25) अशी आरोपींची नावे आहेत. 

हे दोन्ही आरोपी आपण बॉलिवुडच्या प्रसिद्ध दिग्दर्शक आणि प्रोड्यूसरकडे कॅमेरामनचे काम करत असल्याचे सांगून कॅमेरा भाड्याने घेत असत आणि त्यानंतर हे दोघेही कॅमेेरा विकत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नारायण पाटील यांनी दिली.

या दोन्ही आरोपींवर 420/43 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून 5.44 लाख किमतीचा कॅमेरा, लेन्स आणि ट्रायपॉड हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांवर गोरेगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असून, त्यांना 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.