• पेडर रोडमधील कार दुर्घटनेत चालक जखमी
  • पेडर रोडमधील कार दुर्घटनेत चालक जखमी
SHARE

पेडर रोड - भरधाव वेगात येणाऱ्या कार चालकाचा ताबा सुटल्याने डिव्हायडरला धडक बसून अपघात झाल्याची घटना पेडर रोड परिसरात घडलीय. यामध्ये कारचालक जखमी झालाय. बुधवारी रात्री 11 वाजता नरिमन पॉइंटहून वरळीला जात असताना अचानक कार चालकाचा ताबा सुटल्याने कार डिव्हायडरला जाऊन धडकली. यामध्ये कारच्या पुढील भागाचा चक्काचुर झाला आहे. तर जखमी कार चालकाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना झाली त्यावेळी चालक मद्यधुंदवस्थेत होता का याचा तपास पोलीस करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या