मुंबईत ताज हॉटेलजवळ पोलिसांनी पाठलाग करून संशयास्पद कार थांबवली

गाडीत असलेल्या सामानामुळेच कार चालक वेगाने गाडी चालवत होता.

मुंबईत ताज हॉटेलजवळ पोलिसांनी पाठलाग करून संशयास्पद कार थांबवली
SHARES

मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध ताज हॉटेलजवळ, टिंटेड ग्लास असलेल्या कारमध्ये तलवारी, बटण चाकू, लोखंडी रॉड आणि इतर धारदार वस्तू घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक केली.

रविवारी रात्री एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलने हॉटेलच्या दिशेने जाणाऱ्या संशयास्पद दिसणाऱ्या कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी ही संशयास्पद गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर गाडीचा वेग कमी करण्याऐवजी चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि तेथून पळ काढला.

या वृत्तानुसार, कुलाबा पोलिसांना या संशयास्पद वाहनाबद्दल सावध केल्यानंतर त्यांनी या संशयास्पद वाहनाचा मुकेश मिल कंपाऊंड येथे दुचाकीवरून पाठलाग केला. तेथेच पोलिसांनी कारमधील तीन जणांना पकडले.

वाहनाची तपासणी केल्यावर, पोलिसांनी दोन २७ इंचाच्या आणि एक ९ इंचाची तलवार, वेगवेगळ्या आकाराचे तीन चाकू, काठ्या, लोखंडी रॉड आणि एक बटन चाकू जप्त केला.



हेही वाचा

Exclusive : अजब चोरीची गजब कहाणी! तरुणांचा सापळा आणि चोर जाळ्यात

ठाण्यातील मिट्रॉन लाउंज सील, क्रिकेटपटूही लाउंजमध्ये होता उपस्थित

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा