क्रिकेटरने नेली प्लॅटफॉर्मवर कार

अंधेरी - अंधेरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एक वर सोमवारी सकाळी अचानक कार आली. त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. सोमवारी सकाळी 7.15 वाजता ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. हरमित सिंह बधान (25) असं या कार चालकाचं नाव अाहे. हरमित सिंह बधान हा क्रिकेटर असून तो १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघातून खेळला आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल संघाचाही तो सदस्य राहिलेला आहे.

रेल्वे पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलंय. तो नशेत कार चालवत होता का हे वैद्यकीय अहवालातूनच स्पष्ट होईल. हरमित सिंह बधान हा मालाड येथे राहणार आहे. नोव्हेंबर 2016 मध्येही अंधेरी स्टेशनवर अशीच एक घटना घडली होती.

                 

रेल्वेच्या प्रतिक्षेत प्रवाशी प्लॅटफॉर्मवर उभे असताना अचानक कारच तिथे आल्याने प्रवाशांची धावपळ झाली.

                 

  • अंधेरी स्टेशनवरील गेल्या काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे. 25 नाव्हेंबर 2016 रोजी याच स्टेशनवर कसा झाला होता अपघात? हे पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 

https://www.mumbailive.com/mr/city/when-car-enters-platform-at-andheri-station-3980

Loading Comments