शाळेविरोधात निदर्शनं करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

शाळेविरोधात निदर्शनं केल्याबद्दल पोलिसांनी काही विद्यार्थ्यांचे पालक आणि मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह ७० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शाळेविरोधात निदर्शनं करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
SHARES

मुंबईच्या कांदिवलीमध्ये फीच्या मुद्द्यावर परवानगी न घेता शाळेविरोधात निदर्शनं केल्याबद्दल पोलिसांनी काही विद्यार्थ्यांचे पालक आणि मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह ७० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

एका अधिका्यानं बुधवारी ही माहिती दिली. मंगळवारी निषेधासाठी त्यांच्याविरूद्ध समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं ते म्हणाले.

अधिकाऱ्यानं सांगितलं की, "लॉकडाऊन दरम्यान शुल्क आकारण्यासारख्या काही मुद्द्यांवरून मनसेचे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचे पालक कांदिवली इथल्या शाळेत जमले. हे लोक परवानगी न घेता जमले आणि घोषणाबाजीही केली." पोलिस नंतर घटनास्थळी पोहचले आणि निदर्शकांना घरी परतण्यास सांगितले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरूद्ध कलम १४१,१४७, २६९ आणि आयपीसीच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

समता नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू कसबे यांनी सांगितलं की, आम्ही एफआयआर दाखल केली आहे. परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तपास केला जात आहे.



हेही वाचा

अन्वेय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णबला आवाहन देण्यास मंजूरी

मुंबईच्या गल्लीबोळात राहणार आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा