निरूपम यांचा प्रचार कुस्तीपटू नरसिंग यादवला भोवला

दिल्लीत २०१० मध्ये झालेल्या ‘राष्ट्रकूल स्पर्धेत’ भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादव पून्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

निरूपम यांचा प्रचार कुस्तीपटू नरसिंग यादवला भोवला
SHARES

दिल्लीत २०१० मध्ये झालेल्या ‘राष्ट्रकूल स्पर्धेत’ भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादव पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. कुस्तीपटू नरसिंग यादव हा सध्या मुंबई पोलिस दलात पोलिस उपअधिक्षक(एसीपी) पदावर कार्यरत आहे. मात्र पोलिस दलात कार्यरत असून देखील नरसिंग यादव हा उत्तर मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम याचा प्रचार करत असल्याचं पुढे आल्यानंतर त्याच्याविरोधात नुकताच अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निरूपम यांच्या स्टेजवर यादव

मुंबईत लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी सिनेकलाकार किंवा खेळाडूंचा लोकप्रियतेचा उपयोग करताना दिसत आहेत. मात्र उमेदवाराचा फायदा करून देण्याच्या नादात कुस्तीपटू एसीपी पोलिस अधिक्षक नरसिंग यादव अडचणीत सापडला आहे. २०१० मध्ये नरसिंग यादवने राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्यामुळे त्याची नियुक्ती थेट पोलिस उपअधिक्षकपदी करण्यात आली होती. नियमानुसार कोणत्याही सरकारी
अधिकाऱ्याला निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करता येत नाही. मात्र असे असताना काँग्रेसचे उत्तर पश्चिमचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारात नरसिंह हे सहभागी झाले होते. एवढेच नाही तर निरुपम यांच्यासोबत ते स्टेजवरही झळकत होते. 


निवडणूक आयोगाने घेतली दखल

सरकारी अधिकारी असलेले यादव हे स्टेजवर प्रचार करत असल्याची बाब निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसह  पोलिसांच्या ही लक्षात आली. त्यानुसार खात्रीसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी निरुपम यांच्या सभेदरम्यान काढण्यात आलेले चित्रीकरण तपासले. त्यात यादव हे काँग्रेस नेत्यांसोबत आढळल्यानंतर त्यांच्याविरोधात अंबोली पोलिस ठाण्यात ‘रिप्रेझेंन्टेटीव्ह ऑफ पोलिस कायदा’ कलम १२९(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारी अधिकाऱ्यानं मतदारांवर दबाव अथवा प्रकार केल्यानंतर या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तरतुद कायद्यात आहे. त्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणामुळे लवकरच यादव यांना पोलिस दलातील विभागीय चौकशीलाही सामोरे जावे लागणार आहे. 


हेही वाचा-

माॅडेलचे अश्लील व्हिडीओ काढून बदनामी करणाऱ्यास अटक

बेनामी ६ कोटी रुपयांना अद्याप वाली नाहीसंबंधित विषय