सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी अवैध्य क्यूआर कोडची विक्री, गुन्हा दाखल

काही दिवसांपासून मंदिर परिसरात क्यूआर कोडची अवैधरीत्या विक्री केली जात असल्याचं उघड झालं.

सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी अवैध्य क्यूआर कोडची विक्री, गुन्हा दाखल
SHARES

प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी लागणाऱ्या क्यूआर कोडची अवैध विक्री केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. मंदिर न्यासाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपासून मंदिर परिसरात क्यूआर कोडची अवैधरीत्या विक्री केली जात असल्याची माहिती दादर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चौकशी सुरू असताना ३० नोव्हेंबरला एका वर्तमानपत्राच्या पत्रकाराला मंदिर परिसरात क्यूआर कोडची विक्री करण्यात आली. याबाबत या पत्रकारानं मंदिर प्रशासनाकडे तक्रार केली होती.

दादर पोलीस ठाण्यानं चौकशी करून गुरूवारी सिद्धिविनायक गणपती मंदीर न्यासाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या तक्रारीच्या आधारे संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून भाविकांना दर्शन घेण्याकरिता न्यासातर्फे सिद्धिविनायक अ‍ॅपद्वारे क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आलेली होती. दर्शनासाठी आवश्यक असणारा क्यूआर कोड मिळवण्यासाठी भाविकाला सिद्धिविनायक न्यासानं तयार केलेला अ‍ॅप सर्वप्रथम आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करावं लागतं.

हा क्यूआर कोड विनामूल्य आहे. ७ ऑक्टोबरपासून या प्रणालीद्वारे विनामूल्य दर्शन सुरू करण्यात आले होते. या संगणकीय प्रणालीचा गैरफायदा घेऊन आरोपी क्यूआर कोडची अवैध विक्री करत होते.



हेही वाचा

धक्कादायक! 'त्या' मुलीचा आईनेच केला खून

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं अखेर निलंबन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा