पीएनबी घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी २३ जणांना आरोपी करण्यात आलं असून १९ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ४ जण फरार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल
SHARES

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी कारवाईचा फास आवळण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्यांतील २३ आरोपींविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल केले. या घोटाळ्यात २३ जणांना आरोपी करण्यात आलं असून १९ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ४ जण फरार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.


काय आहेत आरोप?

सीबीआयने सोमवारी पीएनबी घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात नीरव मोदीच्या कंपनीने लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि लेटर्स ऑफ क्रेडिट यांचा दुरुपयोग केला. याचबरोबर देशाबाहेरील कंपनीत पैसे वळते कसे केले? याचा उल्लेख करण्यात आला आहे. यासाठी पीएनबीच्या ब्रॅडी ब्रँचनं नीरव मोदी आणि मेहूल चोकसीच्या कंपन्यांसाठी चुकीच्या पद्धतीनं १४४ लेटर ऑफ अंडरटेकिंग दिल्याचंही म्हटलं आहे. या सर्व घोटाळ्यात पीएनबीच्या माजी एमडी आणि सीईओ उषा अनंत सुब्रमण्यम यांच्या नावाचा समावेश असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या त्या अलाहाबाद बँकेच्या प्रमुख आहेत.


या घोटाळ्यात 'यांचा'ही समावेश

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर पीएनबीच्या मुंबई येथील झोनल उपमहाव्यवस्थापकांनी २९ जानेवारी रोजी नीरव मोदी, त्याची पत्नी अॅमी, भाऊ निशाल आणि मामा मेहूल यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान या घोटाळ्याशी संबधित आणखी दोन गुन्हे सीबीआयने दाखल केले आहे. या तक्रारींमधील बहुतांश आरोपी सारखे आहेत. या घोटाळ्यात नीरव मोदींसह पीएनबीचे संचाकलक ब्रम्हाजी राव, सांजी सरन आणि महाव्यवस्थापक नेहल अहद यांच्या नावाचा समावेश आहे. पीएनबीच्या अधिकाऱ्यांवर आंतरबॅंक संदेशवहनाच्या स्वीफ्ट मेसेजिंग प्रणालीचा दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा