सीबीआयकडून राणा कपूरांच्या मुलींच्या कार्यालयावर धाडसत्र

कर्जवाटपाच्या बदल्यात दिवाण हाऊसिंग कंपनीने (डीएचएफल) राणा कपूर यांच्या कुटुंबियांना ६00 कोटी रुपयांची लाच दिल्याचा संशय

सीबीआयकडून राणा कपूरांच्या मुलींच्या कार्यालयावर धाडसत्र
SHARES

खासगी क्षेत्रातील येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून देशभरात छापे टाकले जात आहेत. मुंबईसह देशभरात सात ठिकाणी सोमवारी सीबीआयने छापे टाकले. दरम्यान कर्जवाटपाच्या बदल्यात दिवाण हाऊसिंग कंपनीने (डीएचएफल) राणा कपूर यांच्या कुटुंबियांना ६00 कोटी रुपयांची लाच दिल्याचा संशय सीबीआय सूत्रांनी व्यक्त केला आहे. येस बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर आर्थिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून तत्कालीन प्रवर्तक राणा कपूर यांना ईडीने काल अटक केली आहे. दरम्यान, राणा कपूर यांच्या मुलींच्या कार्यालयावरही सीबीआयने छापे टाकले. यामध्ये दिल्ली तसेच मुंबईमधील कार्यालयांचा समावेश आहे.

हेही वाचाः- ​रंगाचा बेरंग झाल्यास महिनाभर तुरुंगात जाल​​​

डीएचएफएलच्या अल्प मुदतीच्या कर्जरोख्यांत येस बँकेने ३ हजार ७00 कोटी रुपये गुंतवले होते. हा पैसा गुंतवण्याच्या बदल्यात दिवाण हाऊसिंगने राणा कपूर व त्यांच्या कुटुंबियांना तब्बल सहाशे कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. राणा कपूर व कपिल वाधवान यांनी यासाठी कट रचल्याचाही सीबीआयचा आरोप आहे. मुंबईस्थित डीएचएफएलचे याआधीच दिवाळे निघालेले आहे. येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार एप्रिल-जून २0१८ मध्ये सारा कट रचण्यात आला होता. येस बँकेचा पैसा दिवाण डीएचएफएलमध्ये गुंतवण्याच्या बदल्यात दिवाण हाऊसिंगने कपूर कुटुंबाच्या डीओआयटी अर्बन व्हेंचर्स इंडिया प्रा. लि. ला प्रचंड प्रमाणावर पैसा दिला होता.

हेही वाचाः- ​हार्दिक पांड्याचं पुनरागमन; भारतीय संघाची घोषणा​​​

हवाला प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राणा कपूर यांचे राहणीमान अतिशय उच्च दर्जाचे होते तसेच आलिशान पाट्र्या देण्यासाठी ते प्रसिद्ध होते, असे सूत्रांनी सांगितले. जर तुम्ही मोठा पैसा गुंतवला नाही तर तुम्हाला मोठा माल मिळणार नाही; असे ते नेहमी म्हणत असत, अशीही चर्चा आता रंगली आहे. कोणत्याही गोष्टीला नाही म्हणायचे नाही, असा राणा कपूर यांचा स्वभाव होता. गेल्या काही वर्षात येस बँकेचा ताळेबंद २६ पटीने वाढला होता. मात्र यात मोठा घोटाळा होता, असेही बोलले जात आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा