Coronavirus cases in Maharashtra: 668Mumbai: 377Pune: 65Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Navi Mumbai: 22Nagpur: 17Ahmednagar: 17Pimpri Chinchwad: 16Thane: 15Panvel: 11Latur: 8Vasai-Virar: 6Buldhana: 5Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Palghar: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Nashik: 1Washim: 1Amaravati: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 32Total Discharged: 52BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

हार्दिक पांड्याचं पुनरागमन; भारतीय संघाची घोषणा

न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघाची मायदेशी दक्षिण आफ्रिकेशी लढत होणार आहे.

हार्दिक पांड्याचं पुनरागमन; भारतीय संघाची घोषणा
SHARE

न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यानंतर भारतीय संघाची मायदेशी दक्षिण आफ्रिकेशी (South Africa) लढत होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२ मार्चपासून सुरु होणार आहे. तसंच, या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. यावेळी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानं संघात पुनरागमन केलं आहे. १५ सदस्यीय संघात सुनिल जोशी (Sunil Joshi) यांच्या निवड समितीनं (Selection Committee) हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांना संधी दिली आहे.

२९ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलआधी (IPL) भारतीय संघाची (Indian Cricket Team) ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका (International Match) असणार आहे. नुकताच पार पडलेल्या स्थानिक टी-२० स्पर्धेत हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) फटकेबाजी केली होती. त्यातच रोहित शर्मा (Rohit Sharma) अजुनही दुखापतीमधून सावरला नसल्यामुळं शिखर धवनला आणखी एक संधी देण्यात आलेली आहे. या मालिकेसाठीही विराट कोहलीकडेच भारतीय संघाचं नेतृत्व असणार आहे.

भारतीय संघ :

शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल.


हेही वाचा -

मोबाइल न दिल्याच्या रागातून पतीने केली पत्नीची हत्या

मोबाइलच्या टॉर्चमुळं कामगाराचा झाला मृत्यूसंबंधित विषय
संबंधित बातम्या