शाहरुख खानच्या मुलाला तुरुंगात टाकणाऱ्या समीर वानखेडेंच्या घरावर CBI चा छापा

सीबीआयचं वानखेडेंच्या घरात काही वेळापासून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

शाहरुख खानच्या मुलाला तुरुंगात टाकणाऱ्या समीर वानखेडेंच्या घरावर CBI चा छापा
SHARES

एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआय (CBI) छापा घातलाय. एनसीबीनं (Narcotics Control Bureau) समीर वानखेडेंविरोधात बेहिशोबी मालमत्ता (Misappropriation of Assets) जमवल्याची तक्रार केली होती. त्यासंदर्भात रिपोर्ट दिल्यानंतर सीबीआयनं ही कारवाई केली आहे.

सीबीआयचं वानखेडेंच्या घरात काही वेळापासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. मुंबई, दिल्ली, रांची, कानपूरमधल्या जवळपास 29 ठिकाणी यासंदर्भात सर्च ऑपरेशन सुरू आहे. 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drug Case) चांगलेच चर्चेत आले होते. NCB ने समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली 2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई बंदरातून एका क्रूझ जहाजावर हाय-प्रोफाइल छापा टाकला होता. यात बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानसह 20 लोकांना अटक केली.

सुमारे तीन आठवडे तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन याची जामिनावर सुटका झाली. मोठ्या वादानंतर दिल्लीतील एनसीबीच्या पथकाने तपास हाती घेतला आणि वानखेडे यांची बदली करण्यात आली.

समीर सावंत यांच्या जात प्रमाणपत्राबाबत वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक (Nawab Malik) यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला होता. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचे सांगत नोकरी मिळवली.

वानखेडे यांनी फर्जिवाडा केला आहे आणि त्यांनी नोकरी मिळवली, असा आरोप केला होता. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हे आरोप फेटाळून लावत मुस्लिम नसून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचा दावा केला होता

कोण आहेत समीर वानखेडे
समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेचे भारतीय अधिकारी आहेत. 2021 पर्यंत त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर म्हणून काम केले. एनसीबीमध्ये दाखल होण्यापूर्वी, समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय तपास संस्था आणि एअर इंटेलिजन्स युनिटमध्ये काम केले आहे. भारतीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कस्टम विभागात करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहायक आयुक्त (Assistant Commissioner Customs) म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षं काम केलं.

अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती
समीर वानखेडे हे मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. समीर आणि क्रांती यांचं 2017 मध्ये लग्न झालं.



हेही वाचा

बॉडीबिल्डरचा आई वडिलांवर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा