SHARE

आयसीआयसीआय-व्हिडीओकाॅन कर्जवाटप प्रकरणी अखेर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागा (सीबीआय)ने व्हिडीओकाॅनचे वेणूगोपाल धूत आणि चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर यांना चांगलाच दणका दिला आहे. सीबीआयनं व्हिडीओकाॅन आणि दिपक कोचर यांच्या नूपाॅवर रिन्युएबल कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच या कंपन्यांच्या कार्यालयांवर गुरूवारी छापे मारले आहेत. मुंबई आणि औरंगाबादमध्ये ही कारवाई झाली असून याप्रकरणी आता आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर यांच्याही चौकशीची शक्यता व्यक्त होत आहे.


असं आहे प्रकरण 

आयसीआयसीआयच्या चंदा कोचर यांनी कर्जवाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्ता यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित यासंबंधीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कर्जवाटप घोटाळ्याचा पदार्फाश झाला होता. चंदा कोचर यांनी धूत यांच्या व्हिडीओकाॅनला मंजुर केलेल्या कर्जाच्या मोबदल्यात धूत यानी चंदा कोचरचे पती दीपक कोचर यांच्या नूपाॅवर कंपनीमध्ये ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप अरविंद गुप्ता यांनी केला होता. दरम्यान हे प्रकरण तापल्यानंतर चंदा कोचर यांनी आॅक्टोबर २०१८ मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका पदाचा राजीनामा दिला होता. 


मुंबई-औरंगाबादमध्ये छापे

याप्रकरणी सीबीआयनं दहा महिन्यांपूर्वी, मार्च २०१८ मध्ये चौकशी सुरू केली होती. धूत, दीपक कोचर यांची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली होती. या  चौकशीनंतर अखेर दहा महिन्यानंतर सीबीआयनं गुरूवारी व्हिडीओकाॅऩ आणि न्यूपाॅवरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच गुन्हा दाखल झाल्यानंतर व्हिडीओकाॅऩ आणि न्यूपाॅवरच्या कार्यालयांमध्ये छापे मारले आहेत. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलासह औरंगाबादमधील कार्यालयांमध्ये सीबीआयकडून छापे मारण्यात आले आहेत. सीबीआयकडून सध्या चौकशी सुरू असल्याचं समजतं आहे.संबंधित विषय
ताज्या बातम्या