१५ दिवसांत १४,३६८ चालकांना इ-चलान


१५ दिवसांत १४,३६८ चालकांना इ-चलान
SHARES

मुंबई - मुंबईच्या कानाकोपऱ्यात बसवण्यात आलेल्या सीसीटीएनएस प्रणाली (सीसीटीव्ही) कॅमेऱ्यांचा ट्रॅफिक पोलिसांना चांगलाच फायदा झालाय. शहरभरात लावलेल्या 4717 कॅमेऱ्यांद्वारे ट्रॅफिक पोलिसांनी फक्त 15 दिवसांत तब्बल 14,368 इ - चलान बजावली आहेत. 4 ऑक्टोबरपासून ट्रॅफिक पोलिसांनी ही अद्ययावत सेवा सुरू केली. त्यानंतर केवळ 15 दिवसांतच हा आकडा पोलिसांनी गाठलाय. सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे थांबणं, विना हेल्मेट वा ट्रिपल सीट दुचाकी चालवणं, विना सीटबेल्ट गाडी चालवणं, गाडी चालवताना फोनवर बोलणं असे नियम मोडणाऱ्यांवर या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असते.

काय आहे इ- चलान

मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांवर तसंच सिग्नलवर मुंबई सीसीटीएनएस प्रोजेक्टच्या अंतर्गत अद्ययावत कॅमेरे लावले आहेत. त्याचं आउटपुट ट्रॅफिक पोलिसांना देण्यात आलंय. नियंत्रण कक्षातून प्रत्येक सिग्नलवर नजर ठेवण्यात येत असून कुणीही नियमांचं उल्लंघन करताना आढळल्यास त्याचा एक फोटो काढून तोडलेल्या नियमाच्या माहितीसह दंडाची रक्कम असा तपशील संबधित व्यक्तीच्या मोबाइलवर पाठवण्यात येतो.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा