बेकायदा रेल्वे प्रवास करणाऱ्यांकडून १ कोटींचा दंड वसूल

अनेक जण विनातिकिट प्रवासही करत आहेत. अशा प्रवाशांकडून तब्बल १ कोटी रुपयांचा दंड वसुल केला.

बेकायदा रेल्वे प्रवास करणाऱ्यांकडून १ कोटींचा दंड वसूल
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनमुळं मुंबईची वाहतूक सेवा बंद होती. परिणामी चाकरमान्यांना खिशाला कात्री लावून प्रवास करावा लागत होता. अशातच रस्त्यांवरील खड्डे, वाहतूककोंडी यामुळे बेजार झालेले प्रवासी लोकलने प्रवास करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. रस्ते मार्गे खर्चिक प्रवास टाळण्यासाठी अनेक जण कारवाईची तमाही बाळगत नाहीत. अनेक जण विनातिकिट प्रवासही करत आहेत. अशा प्रवाशांकडून तब्बल १ कोटी रुपयांची वसुली केल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली.

१५ जून ते ४ नोव्हेंबर या दरम्यान मुंबई उपनगरीय लोकलमध्ये विनातिकिट प्रवास करणाऱ्या २५,४०० प्रवाशांवर कारवाई केली आली. यात अत्यावश्यक सेवेतील बोगस ओळखपत्र वापरून प्रवास करणाऱ्यांचाही समावेश आहे. या प्रवाशांकडून तब्बल ७५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष मेल-एक्स्प्रेसमधील २२०० प्रवाशांकडून २५ लाख रुपये दंड आकारण्यात आला.

मुंबईतील रेल्वे स्थानकांत प्रवेश करण्यासाठी अनेक चोरवाटा, छुपे रस्ते आहेत. रस्ते प्रवास परवडत नसल्याने अनेक जण या चोरवाटांच्या मदतीने स्थानकात प्रवेश करतात. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा