मालाडमध्ये दीड कोटींचे चरस हस्तगत

मालाड येथील दोन तरुण पश्चिम उपनगरात ड्रग्ज विकत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १२ च्या पथकाला मिळाली होती.

मालाडमध्ये दीड कोटींचे चरस हस्तगत
SHARES

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मालाडमधून दीड कोटी रुपयांचं चरस हस्तगत केलं आहे. हे चरस विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बिहारजवळील नेपाळच्या सीमेवरून हे चरस भारतात आणले जात होते. 

मालाड येथील दोन तरुण पश्चिम उपनगरात ड्रग्ज विकत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १२ च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचून सुरज विजयबहादूर यादव उर्फ पोट्या याला पकडले. यावेळी त्याचा साथीदार किसन हरिप्रसाद गौड उर्फ साठे हा पसार झाला. पोलिसांनी सूरजकडून सुमारे एक किलो ८०० ग्रॅम चरस हस्तगत केले. सूरज याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी किसन गौड यालाही अटक केली.

किसन याच्याकडे  तीन किलो चरस सापडले. किसन गौड हा काही आंतरराष्ट्रीय तस्करांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. चरस नेपाळमार्गे बिहार आणि तेथून मुंबईत ड्रग्ज आणत असल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.

दरम्यान, वरळी येथील अंमली पदार्थविरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या पथकाने धारावीमध्ये ड्रग्ज विकणाऱ्या एका तरुणाला अटक केली. या तरुणाकडून पोलिसांनी २१ लाखांचे एमडी ड्रग्ज हस्तगत केले आहे.



हेही वाचा -

महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांना तिसरी संधी

लसीकरणासाठी २० खासगी रुग्णालयांना परवानगी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा