महिलेवर बलात्कार करणाऱ्या ढोंगी बाबाचा पर्दाफाश

 CHARKOP
महिलेवर बलात्कार करणाऱ्या ढोंगी बाबाचा पर्दाफाश

कांदीवली - चारकोप परिसरातील लोकांना फसवणाऱ्या एका बाबाचा पर्दाफाश झाला आहे. या बाबाच्या सहकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, ढोंगी बाबा फरार आहे. अंकुश शेटे हा या ढोंगी बाबाचा साथीदार असून, पोलीस बाबाबद्दल अधिक माहिती त्याच्याकडून घेत आहेत. 

बाबासोबत असणाऱ्या अंकुश शेटे याने चारकोपमध्ये राहणाऱ्या एका परिवाराची भेट या ढोंगी बाबाशी करून दिली. अपत्य होत नसल्याने आणि त्यांच्यावर सुरू असलेली पोलीस केस संपत नसल्याने हे कुटुंब या ढोंगी बाबाला भेटलं. पूजा केल्यानंतर तुला अपत्य होईल आणि केसही मिटेल असं सांगून या ढोंगी बाबाने आपल्यावर बलात्कार केला आणि आपल्याकडून पैसे उकळले असा आरोप पीडितेने केला. दरम्यान पोलिसांनी या ढोंगी बाबाविरोधात बलात्कार आणि जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस या ढोंगी बाबाचा शोध घेत आहेत.

Loading Comments