व्यापाऱ्याला ठगणाऱ्या टोळीला अटक


व्यापाऱ्याला ठगणाऱ्या टोळीला अटक
SHARES

कांदिवली - स्वत:ला आरबीय आणि पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याला लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कांदिवली (प.) इथल्या चारकोपमध्ये राहणाऱ्या एका कपड्याच्या व्यापाऱ्याकडे कोट्यवधींच्या जुन्या 500 आणि एक हजाराच्या नोटा असल्याची माहिती या टोळीला मिळाली होती. त्यानुसार या टोळीने योजना आखत व्यापाऱ्याच्या घरी गेले. तेव्हा आपण आरबीआयचे अधिकारी असल्याचं सांगत व्यापाऱ्याकडील एक कोटी 20 लाखांच्या जुन्या 500 च्या नोटा बॅगेत भरल्या. त्याच वेळी आणखीन दोघे व्यापाऱ्याच्या घरी पोहचले आणि आपण चारकोप पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी असल्याचे सांगत व्यापाऱ्याला चारकोप पोलीस ठाण्याच्या गेटपर्यंत नेले. दरम्यान त्यांच्यातल्या एकाने व्यापाऱ्याची गाडी घेवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. जो व्यक्ती व्यापाऱ्याबरोबर गाडीतून उतरला होता त्याने देखील पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्याने त्याला धरून ठेवत आरडाओरड केला. त्याचवेळी पोलीस ठाण्याच्या गेटवर उभ्या असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या भामट्याला पकडलं. त्यानंतर आरोपीने आपलं नाव अमित सोनी असल्याचं सांगितलं. त्यांनतर आरोपीने दिलेल्या माहितीनुसार इतर आरोपी नितिन शाह, भाविन दोषी, महेश चव्हाण, कुणाल परेश, राजेश पटेल आणि इलाही शेट्टी या भामट्यांनाही अटक केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा