लग्नखर्चासाठी 'तिनं' रचला अपहरणाचा कट!


SHARES

विक्रोळी - लग्नाच्या खर्चासाठी एका तरुणीने बाजूलाच राहणाऱ्या एका पाच वर्षाच्या मुलाचे अतिशय चलाखीने अपहरण करून दोन लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार टागोरनगरमध्ये समोर आला आहे. अवघ्या तीन तासात विक्रोळी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या तरुणीला जेरबंद करून पाच वर्षाच्या मुलाची सुटका केली. पुष्पा पुरुषोत्तम कटारिया (27) असs या तरुणीचे नाव आहे. टीव्हीवर सुरू असलेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भातील मालिका पाहून तिने हा कट रचला होता.

26 तारखेला संध्याकाळी तिच्या शेजारी राहणारी महिला कमलादेवी प्रजापती ही आपल्या दोन मुले आणि पुष्पा हिच्यासोबत टागोरनगरमधील त्रिकोण उद्यानात गेली होती. याच ठिकाणावरून पुष्पा आणि कमलादेवी यांचा 5 वर्षांचा मुलगा ऋषभ गायब झाला होता. त्यानंतर पुष्पाने त्याच्या वडिलांना आवाज बदलून फोन करत ऋषभच्या बदल्यात दोन लाख रुपयाची खंडणी मागितली होती. यात तिने एका शेजाऱ्याच्या कागदपत्रांवर नवे सिम कार्ड घेऊन त्यावरून फोन करत पोलिसांनाही चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी अवघ्या तीन तासात पुष्पाला नाहूर स्थानकातून अटक करत ऋषभची सुटका केली आहे.

टीव्ही, प्रसार माध्यम, सोशल मीडिया यांचा उपयोग जितका चांगला तितकाच आता आत्मघाती ठरत असल्याने जनतेने आता सावध असणं गरजेचं झाल्याचंच या घटनेनं पुन्हा सिद्धा झालंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा